कोकण

वेंगुर्ले-वायंगणी किनाऱ्यावर आजपासून कासव महोत्सव

CD

91218


वेंगुर्ले-वायंगणी किनाऱ्यावर
आजपासून कासव महोत्सव

कुडाळ, ता. २४ ः वन विभाग सावंतवाडीमार्फत वायंगणी (ता. वेंगुर्ले) येथे उद्यापासून (ता. २५) दोन दिवसांच्या कासव महोत्सवाचे आयोजन विविध उपक्रमांसह करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्वच समुद्र किनाऱ्याला कमी-अधिक प्रमाणात दुर्मिळ अशा समुद्री कासवांचा (ओलिव्ह रिडले सी टर्टल) अधिवास आढळून येतो. साधारणतः दरवर्षी ऑक्टोबर ते मे या दरम्यान त्यांचा विनीचा हंगाम असतो. स्वच्छ कमी प्रदूषित आणि कमी मानवी हस्तक्षेप असणाऱ्या किनाऱ्यांची निवड ही कासवे अंडी घालण्यासाठी करतात. अंडी घातल्यानंतर मादी कासवे समुद्रात निघून जातात. त्यानंतर अंड्यांच्या ५० ते ६० दिवसांच्या उबवण कालावधीमध्ये भटकी कुत्रे, कोल्हे, मुंग्या आदींकडून त्यांना धोका असल्याने त्यांचे संरक्षण व संवर्धन सावंतवाडी वनविभाग, स्थानिक कासवमित्र, बीच मॅनेजर यांच्या मदतीने करत असतो. गतवर्षी कुडाळ वनपरिक्षेत्रातील वेंगुर्ले व मालवण तालुक्यांतील समुद्र किनाऱ्यांवर मिळून ३२८ समुद्र कासवांची घरटी संरक्षित करून त्यातून बाहेर पडलेल्या सुमारे २१४४३ पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्याची माहिती वनक्षेत्रपाल (कुडाळ) अमृत शिंदे यांनी दिली. कासव संवर्धन व संरक्षणासह त्यांच्या जीवन चक्राबाबत जनजागृती करणाऱ्या कासवमित्रांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये नवजात समुद्री कासवांना त्यांचे नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे, नेचर ट्रेल, मॅग्रुव्ह सफारी तसेच पौराणिक दशावतार (कुर्म अवतार) नाटक आदी उपक्रमांचा समावेश आहे. सहभागी होण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

SCROLL FOR NEXT