कोकण

मालवणात २७ पासून गाबीत महोत्सव

CD

91236
मालवण ः गाबीत महोत्सवाची माहिती पत्रकार परिषदेत देताना परशुराम उपरकर आदी. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)


मालवणात २७ पासून गाबीत महोत्सव

परशुराम उपरकर; चार राज्यांतील समाजबांधव एकवटणार

मालवण, ता. २४ : शहरातील दांडी किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल दरम्यान होणारा गाबीत महोत्सव हा विखुरलेल्या गाबीत समाजाला एकत्र आणणे तसेच गाबीत बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी भरविण्यात येत आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक अशा चार राज्यांतील गाबीत बांधव मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाच्या नियोजनासाठी २१ समित्या गठीत केल्या असून समाजबांधवांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वी करू, असे अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व गाबीत समाज महाराष्ट्र आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गाबीत समाज, मालवण तालुक्याच्या यजमानातून २७ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘गाबीत महोत्सवा’चे आयोजन येथील दांडी किनारी केले आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे गाबीत समाजाचे जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांचे पदाधिकारी आणि गाबीत समाजातील कार्यकर्त्यांची बैठक झाली.
यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सरचिटणीस महेंद्र पराडकर, हरी खोबरेकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, उपाध्यक्षा अन्वेषा आचरेकर, मेघा गावकर, बाबी जोगी, सेजल परब, राजू परब, वेंगुर्ले तालुका सचिव किरण कुबल, दिलीप घारे, मेघनाद धुरी, देवगड तालुका सचिव संजय बांदेकर, उष:कला केळुसकर, नारायण धुरी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संदीप चांदेकर, सचिव दीपक तारी, दिक्षा ढोके, स्वाती कुबल, रश्मीन रोगे, अन्वय प्रभू, पांडुरंग कोचरेकर, भूषण मेतर तसेच आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकार झाली. यावेळी श्री. उपरकर म्हणाले, ‘‘३० एप्रिलला पर्यटन जिल्हा जाहीर झाल्याचे रौप्य महोत्सवी वर्ष असून हा योग साधून महोत्सवाच्या नियोजनाची सर्वांना जबाबदारी दिली आहे. दांडीसह मालवण किनारपट्टीवरील वायरी, तारकर्ली, देवबाग, मेढा, धुरीवाडा, कोळंब, सर्जेकोट, तळाशील, आचरा भागातील कार्यकर्त्यांची समिती गठीत केली आहे. या समितीची बैठक उद्या (ता. २५) रामेश्वर मच्छिमार सोसायटी, दांडी येथे होणार आहे. या महोत्सवाला कोणतीही राजकीय मदत घेतली जाणार नाही. महोत्सवाचे व्यासपीठ गाबीत समाजबांधवांना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविण्यासाठी आहे. कोणतीही राजकीय भाषणे होणार नाहीत.
ते पुढे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय व राज्यस्तरावर कार्य करणाऱ्या बांधवांना ‘गाबीत भूषण’ पुरस्कार दिला जाईल. देवगड येथील मंडळाचा शिमगोत्सव साजरा होणार आहे. २९ एप्रिलला सागरी सुंदरी स्पर्धा होणार आहे. ऑर्केस्ट्रा, नृत्य सादरीकरण तसेच तीन दिवस विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. महोत्सवात समाज बांधवांचे विविध स्टॉल असणार असून यामध्ये मासळीवर आधारित पदार्थांची रेलचेल असेल. मच्छिमारीच्या विविध पारंपरिक पद्धतींविषयी युवकांना व पर्यटकांना प्रत्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यात तालुकावार क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. त्यातील विजेत्यांची अंतिम फेरी मालवणात २६ एप्रिलला दांडी झालझुल मैदानावर होईल. महोत्सवाच्या निमित्ताने गाबीत ध्वजाचे अनावरण करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या व्यासपीठाला मच्छिमार नेते (कै.) ज्ञानेश देऊलकर यांचे, परिसंवाद मंडपास स्वातंत्र्य सैनिक (कै.) हिरोजी तोडणकर यांचे, प्रवेशद्वारास हुतात्मा दत्ताराम कोयंडे यांचे, तर महोत्सव मंडपास मालवणचे माजी उपनगराध्यक्ष सुबोध आचरेकर यांचे नाव देण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी पर्यटन महामंडळ, मत्स्य विभाग, बँका, एलआयसी अशा विविध विभागांच्या
अधिकाऱ्यांनाही आमंत्रित केले असून त्यांच्यामार्फत गाबीत बांधवांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.’’
--
प्रथम मोरयाचा धोंडा येथे पूजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारात सहभागी असणारा गाबीत समाज असून मालवण येथे महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारून आरामाराची राजधानी उभारली. म्हणूनच हा गाबीत महोत्सव मालवणात आयोजित करण्यात येत आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मोरयाचा धोंडा येथे पूजन करून सागरात बहुसंख्य नौकांच्या उपस्थितीत मशाली प्रज्वलित करण्यात येणार आहेत, असे श्री. उपरकर म्हणाले.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT