कोकण

कवडीमोल दराने काजूची खरेदी ः बबन साळगावकर

CD

९११८८
४८८८८

कवडीमोल दराने काजूची
खरेदी ः बबन साळगावकर

शासनाने हमीभाव देणे आवश्‍यक


सावंतवाडी, ता. २४ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही एजंट-खरेदीदारांकडून संघटितपणे काजूचा दर पाडून खरेदी केला जात आहे. त्यामुळे येथील काजू बागायतदारांचे नुकसान होत असून शासनाने काजूला योग्य हमीभाव द्यावा; अन्यथा काजू स्वतः खरेदी करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. या विरोधात संघटित होण्याची गरज व्यक्त करत काजू कवडीमोल दराने विकू नये, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
साळगावकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, कोकणातील प्रमुख उत्पन्न असलेल्या काजूला योग्य हमीभाव मिळत नाही. सध्याच्या काजू हंगामात शेतकऱ्यांचा काजू कवडीमोल दराने खरेदी केला जात आहे. कोकणच्या काजूची पत एक नंबरची असून तो इतरांपेक्षा चविष्ट आहे. हा काजू देशामध्ये चांगला काजू म्हणून ओळखला जातो; परंतु येथे काही जणांकडून संघटितरित्या दर पाडून काजू खरेदी केला जात आहे. त्यामुळे येथील शेतकरी बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी बागायतदारांना न्याय मिळण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तेथील लोकप्रतिनिधी सतर्क राहतात. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना प्रत्येक उत्पन्नाचा हमीभाव मिळत असतो; परंतु कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असूनही हमीभाव मिळत नाही, ही शोकांतिका आहे.
---
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
इथल्या तिन्ही आमदारांनी तसेच खासदारांनी यात वेळीच लक्ष घालावे व शेतकऱ्यांना हमीभाव मिळून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी आंबा, काजू बागायतदारांचा प्रश्न कधी सहभागृहामध्ये लावून धरल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे शासनानेच याची दखल घेऊन बागायतदारांना हमीभाव द्यावा किंवा काजू स्वतः खरेदी करावा, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

SCROLL FOR NEXT