कोकण

क्राईम एकत्रित

CD

जुगार प्रकरणी तिघांवर कारवाई

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर, परटवणे आणि मिरकरवाडा या तीन ठिकाणी बेकायदेशीरपणे जुगार चालवणाऱ्‍यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. २५) दुपारी करण्यात आली. रविकांत वासुदेव घोसाळकर, योगेश कृष्णा फाळके आणि ॠषीकेश दत्ताराम मुरकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. यातील रविकांत हा मारुती मंदिर येथील चणाभट्टीच्या मागे असलेल्या बंद टपरीच्या आडोशाला, योगेश फाळके हा परटवणे नाका येथील बंद गाळ्याच्या जवळ आडोशाला तर ॠषीकेश मुरकर हा मिरकरवाडा पेट्रोल पंपाच्या मागे विना परवाना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम घेउन जुगार खेळ चालवत होते. या तिघांवरही महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

--

गावठी दारू विक्रीप्रकरणी कारवाई

रत्नागिरी : शहरातील भाट्ये-मुरकरवाडी येथे गावठी दारु विक्री करणाऱ्ं‍याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. २५) सायंकाळी करण्यात आली. सोमनाथ सोनुराम लावत्रे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस नाईक वैभव नार्वेकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळी सोमनाथ लावत्रे हा भाट्ये मुरकरवाडी येथील बंधारा रस्त्यावरील पडीक झोपडीत गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्याजवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. लावत्रे विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT