कोकण

‘गोगटे’च्या संशोधक विद्यार्थ्यांचा सन्मान

CD

rat२७१५.txt

बातमी क्र. १५ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२७p१८.jpg-

91701
रत्नागिरी : आयआयटी व सितारा आयोजित कार्यशाळेत संशोधन प्रकल्प सादर केल्याबद्दल गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी. सोबत विद्यार्थी, मार्गदर्शक.
-------------
‘गोगटे’च्या संशोधक विद्यार्थ्यांचा सन्मान

‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ उपक्रमात सहभाग

रत्नागिरी, ता. २७ : उन्नत महाराष्ट्र अभियान ‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ या उपक्रमाच्या अनुषंगाने गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापले संशोधन प्रकल्प सादर केले. मुंबई आयआयटी व ग्रामीण क्षेत्र पर्यायी विकास तंत्रज्ञान (सितारा) विभागातर्फे चिपळुणच्या डीबीजे कॉलेजमध्ये आयोजित कार्यशाळेत प्रकल्प सादर केले. यातील विद्यार्थी संशोधक व त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक यांना गोगटे महाविद्यालयात गौरविण्यात आले.
समाजशास्त्र विभागातील स्वरूप जिरोळे, रोहित ठुकरूल, अर्थशास्त्र विभागातील पौर्णिमा साठे, शुभ्रराणी होरंबे, विज्ञान विभागातील विजयश्री नागले, विदिशा पवार यांनी संशोधन या उपक्रमात सादर केले. समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी महिला बचत गटांचा अभ्यास केला. अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी शहरातील ऑटो रिक्षांचा अभ्यास केला. विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी आंबा व काळी मिरी या स्थानिक उत्पादनांचा अभ्यास करून त्यासंबंधित प्रश्नांवर आपले संशोधन सादर केले. या संशोधनासाठी उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी महाविद्यालय समन्वयक म्हणून काम केले. डॉ. मयूर देसाई, डॉ. सोनाली कदम, प्रा. ऋजुता गोडबोले, डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सचिन सनगरे यांनी मार्गदर्शक म्हणून कार्य केले.
आपल्या ज्ञानाचे वैज्ञानिक उपयोजन गरजेचे असून आपल्या सभोवतालच्या स्थानिक समस्यांना दृष्टीने पाहून त्यांचा अभ्यास व शक्य तेथे समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणे व यासाठी विद्यार्थी दशेपासून कार्यरत असले पाहिजे, असे प्रतिपादन गोगटे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले. तीनही विद्याशाखांचे उपप्राचार्य शोधवेध, आविष्कार अशा संशोधन उपक्रमांसाठी प्रोत्साहित करत असतात. यातून विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती वृद्धिंत होण्यास मदत होते. आयआयटी, मुंबई व ग्रामीण क्षेत्र पर्यायी विकास तंत्रज्ञान (सितारा) विभाग यांनी दिलेल्या संधीमुळे विद्यार्थ्यांना स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करता आला.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT