कोकण

गुहागर ः विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस

CD

-rat२७p३८.jpg ः
91787
गुहागर ः शहराचा प्रारूप विकास आराखडा.

लोगो - गुहागर नगरपंचायत

विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस

दीड हजार हरकती; रस्त्यांच्या आरक्षणांवर अनेक जण नाराज

गुहागर, ता. २७ ः नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्यावर १५०१ जणांनी हरकती नोंदवल्या आहेत. यापैकी सर्वाधिक हरकती या रस्त्यांच्या रुंदीकरणावर आहेत. गुहागर नागरिक मंच आणि भाजपने थेट राज्य सरकारकडे धाव घेतल्याने हा आराखडा रद्द होणार की स्थगिती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गुहागर शहराचा प्रारूप विकास आराखडा ९ फेब्रुवारीला राजपत्रात प्रसिद्ध झाला. या आराखड्यावर हरकती घेण्यासाठी १५ फेब्रुवारी ते १६ मार्च ही मुदत होती. नंतर ही मुदत २५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर सुरवातीचा काही काळ हा आराखडा समजून घेण्यात वेळ गेला. नगरसेवक, विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी हा आराखडा खऱ्या अर्थाने शहरातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवला. त्यानंतर ‘विकास आराखडा की भकास आराखडा’ अशी चर्चा रंगू लागली. गुहागरवासीयांच्या या विरोधाला वाचा फोडण्याचे काम भाजप आणि गुहागर नागरिक मंचाने केले. नागरिक मंच आणि भाजप पदाधिकारी यांनी विकास आराखड्यामधील अनेक त्रुटींबाबत पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी केल्या. दरम्यान, गुहागर शहरवासीयांनी हरकती नोंदवण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती केली गेली.
या सर्वांचा परिणाम म्हणून गुहागर शहरातील सुमारे ३ हजार घरमालकांपैकी जवळपास ४० टक्के घरमालकांनी हरकती नोंदवल्या. शेवटच्या दिवशी तब्बल २०० हून अधिक हरकती नोंदवण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक हरकती या वेलदूर गुहागर १८ मीटरचा रस्ता, शहरांतर्गत वाडीवस्त्यांमधून जाणारे रस्ते, वरचा पाटतर्फे गुहागर शहरामधून जाणारा नाव नसलेला महामार्ग यांच्याशी संबंधित आहेत. याशिवाय निवासी क्षेत्र, हरितक्षेत्र दाखवण्यात झालेल्या चुका, चुकलेल्या हद्दी, या संदर्भातील हरकती घेण्यात आल्या आहेत. शहराच्या विकास आराखड्यात आरक्षित केलेल्या काही जमिनींबाबत जागामालकांनी हरकती नोंदवल्या आहेत. आता जनतेचे लक्ष हा विकास आराखडा रद्द होणार की स्थगित होणार, घेतलेल्या हरकतींवर सुनावणी होणार की नाही, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT