कोकण

५० उमेदवारांना नोकरीचे पत्र

CD

rat2822.txt

बातमी क्र. 22 (टुडे पान 2 साठी)

फोटो ओळी
-rat28p28.jpg-


91933
रत्नागिरी : सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनीने मंगळवारी आयटीआयमध्ये आयोजित भरती मेळाव्यातील पात्र उमेदवारांना नोकरीचे पत्र देताना महाव्यवस्थाक (वित्त) राजीव पाध्ये.
--------------
५० उमेदवारांना नोकरीचे पत्र

सेइनुमेरो कंपनीतर्फे आयोजन; नाचणे आयटीआयमध्ये भरती मेळावा

रत्नागिरी, ता. २९ : आयटीआय उत्तीर्ण झालेल्या पात्र ५० उमेदवारांना पुण्यातील सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनीने थेट नोकरीचे पत्र दिले. पुण्यात दोन प्लँट असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील या कंपनीने नाचणे आयटीआय येथे भरती मेळावा आयोजित केला होता. उत्तीर्ण उमेदवारांना पुण्यातील सेइनुमेरो कंपनीत नोकरी मिळाल्याने ते खूश झाले.
सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी शिंदेवाडी, भोर (जि. पुणे) येथे आहे. कंपनीमध्ये मशिन ऑपरेटर पदासाठी भरती केली. त्यासाठी आयटीआय ट्रेडमधील टर्नर, फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर, मिलर, ड्रिलर, मॅकेनिकल, मशिन टुल्स मेंटेनन्स, डिप्लोमा मेकॅनिकल आदी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार मुलाखतीसाठी आले होते.
कंपनीचे महाव्यवस्थापक (वित्त) राजीव पाध्ये यांनी सांगितले की, ‘सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी १९९२ पासून ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहे. त्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे. मी मूळचा धामणी (संगमेश्वर) येथील असून, आपल्या रत्नागिरीतील उमेदवारांना संधी मिळावी यासाठी प्रथमच येथे भरती मेळावा घेतला.’
मेळाव्याचे उद्‍घाटन माजी आमदार व सिंधुरत्न योजनेचे सदस्य प्रमोद जठार व रत्नागिरी जिल्हा बेरोजगार व स्वयंरोजगार सहकारी संघाचे संचालक राजू भाटलेकर, आयटीआयचे प्राचार्य एस. जी. कोतवडेकर, महाव्यवस्थापक राजीव पाध्ये, भाजप नेते राजीव कीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील बीटीआरआय अधिकारी नीलेश मद्रे, सेइनुमेरो कंपनीचे अधिकारी श्रीशैल मैंदरगीकर, सोमनाथ गोरड, खेमचंद्र बोबडे, शेखर डिमळे, विकास काळे, संतोष चव्हाण, आदी उपस्थित होते.
.........................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT