कोकण

उत्कृष्ट ढोलकी वादकाचा पुरस्कार लक्ष्मी कुडाळकर-लांबेना

CD

- rat२८p२९.jpg ः
९१९४४
लक्ष्मी कुडाळकर-लांबे
-
ढोलकी वादकाचा पुरस्कार लक्ष्मी कुडाळकर-लांबेंना

लघुचित्रपट महोत्सवात वितरण ः अभ्यास व कार्यक्रमातून मिळवला लौकिक

मंडणगड, ता. २९ ः आर्याखी एन्टरटेनमेंट प्रस्तुत राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात मंडणगड तालुक्यातील दहागाव येथील लक्ष्मी विठ्ठल कुडाळकर-लांबे यांना उत्कृष्ट महिला ढोलकी वादक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आर्याखी एन्टरटेनमेंटचे प्रमुख संयोजक महेश्वर तेंटांबे, संयोजन समिती सदस्य अनंतर सुतार, सुरेश डाळे, मनीषा व्हटकर यांनी या पुरस्कार दिल्याची घोषणा केली होती. मंडणगड तालुक्यातील दहागाव येथील संगीत संयोजक नीलेश लांबे यांच्या पत्नी लक्ष्मी लांबे यांचे सध्या पतीसमवेत पुणे येथे वास्तव्यास आहेत. संगीत संयोजनासह वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमात ढोलकी वादक म्हणून कार्यक्रमाची रंगत वाढवत असतात. लोककलेतील रांगड्या म्हणाव्या व लौकिकर्थाने महिलांच्या नसलेल्या ढोलकी वादनाच्या क्षेत्रात लक्ष्मी यांनी नाव कमवले. बालपणापासून ढोलकी वादन, गायन, तबलावादन अशा विविध गुणांत पांरगत असलेल्या लक्ष्मी यांनी खरे प्रेम केले ते महाराष्ट्राचे लाडके वाद्य ढोलकीवर. या क्षेत्रात सतत अभ्यास व कार्यक्रम करत त्यांनी यापूर्वी अनेक लौकिक मिळवले. लक्ष्मी यांनी लग्नानंतरही कला सोडली नाही. मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात आपल्या ढोलकीची छाप पाडली. अकलूज लावणी महोत्सवात २००५, २००७, २०१५ या वर्षात राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. बालगंधर्व सन्मान सोहळ्यात महिला ढोलकीवादक म्हणून पुरस्कार देऊनही त्यांचा गौरव झाला आहे. मुंबईमध्ये राज्यस्तरीय लावणी महोत्सवात ढोलकी वादनाचे पहिले पारितोषिक अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते मिळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT