कोकण

मोकाट गुरांवर कारवाईबाबतचे उपोषण आश्वासनाअंती स्थगित

CD

91976
मालवण ः माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या शिष्टाईनंतर खोत यांनी उपोषण स्थगित केले.

मोकाट गुरांवर कारवाईबाबतचे
उपोषण आश्वासनाअंती स्थगित
मालवण, ता. २८ : शहरासह धुरीवाडा भागातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी धुरीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर खोत यांनी कालपासून पालिकेसमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या मध्यस्थीनंतर रात्री स्थगित केले.
मोकाट गुरांचा त्रास कमी करण्यासाठी सामंजस्याने तोडगा काढण्याची ग्वाही कांदळगावकर यांनी दिली. शहरासह धुरीवाडा, खोतमठ परिसरातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी खोत यांनी कालपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, भाई मांजरेकर, विनोद भोगावकर आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला होता. माजी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी रात्री भेट घेऊन मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT