कोकण

‘शिवसंस्कार’चे रविवारी पुरस्कार वितरण

CD

92023
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत डॉ. सोनल लेले, प्रा. रुपेश पाटील, भरत गावडे आदी.


‘शिवसंस्कार’चे रविवारी पुरस्कार वितरण

गोव्यात आयोजन; मुख्यमंत्री सावंत, मंत्री केसरकरांची उपस्थिती

सावंतवाडी, ता. २८ ः येथील ‘शिवसंस्कार’ संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध ऐतिहासिक स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (ता. २) सायंकाळी पाचला गोव्यातील रवींद्र भवन, साखळी येथे होणार आहे, अशी माहिती ‘शिवसंस्कार’च्या अध्यक्ष डॉ. सोनल लेले यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. रुपेश पाटील, भरत गावडे उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, डिचोली (गोवा) आमदार चंद्रकांत शेटये उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेतर्फे विशेष सन्मानाचे मानकरी पांडुरंग बलकवडे (ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुणे), अॅड. वल्लभ गावस-देसाई (इतिहास अभ्यासक, गोवा), प्रभाकर ढगे (साहित्यिक व इतिहास अभ्यासक), प्रज्ञा मातोंडकर (माध्यमिक हायस्कूल, मळगाव), अतुल मुळीक (कुडणे, गोवा), गोविंद साखळकरे (ऐतिहासिक नाणी प्रदर्शन, डिचोली), अवधूत बिचकरे (शिवसंस्कार डिजिटल प्रसारक, करोड) तसेच विषेश सत्कारमूर्ती नारायण मानकर (मुख्याध्यापक, कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी), अनिल ठाकरे (शिक्षक, कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी) हे उपस्थित राहणार आहेत. सन्मान सोहळ्यानंतर रात्री आठला अखिल नाटयसृष्टीत ‘वन्समोअर’ मिळवून इतिहास घडवणारा नाट्यप्रयोग ‘इथे ओशाळला मृत्यू’ (लेखक-वसंत कानेटकर, दिग्दर्शक-गणेश ठाकूर, सादरकर्ते-शिवगणेश प्रोडक्शन्स, मुंबई) सादर होणार आहे. तसेच गोविंद साखळकर संग्रहित ऐतिहासिक नाणी प्रदर्शन देखील होणार असल्याचे डॉ. लेले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT