कोकण

साडवलीतील सूर्यफुलांच्या शेतीने वेधले सर्वांचे लक्ष

CD

92103

92104

साडवलीतील सूर्यफुलांच्या शेतीने वेधले लक्ष
ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन; शेतीमध्ये विविध यशस्वी प्रयोग
देवरूख, ता. २९ः अनेकदा आपण विचार न करता शेती तोट्याचीच आहे असे म्हणतो; पण क्षणभर ऐन उन्हाळ्यात सूर्यफुलांनी बहरलेले शेत पाहिले तर पाहणाऱ्यांची नजर सुखावून जाते. कोकणात सूर्यफुलाची शेती अगदी प्रयोग म्हणूनच केली जाते. असाच प्रयोग संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील शेतीतज्ञ योगेश मोहिरे यांनी शेतजमिनीत केला आहे.
मोहिरे यांनी भाजीपाला, भुईमूग अशा पिकांची लागवड करताना सूर्यफुलांच्या शेतीचा केलेला प्रयोग यशस्वी झाला असून, सध्या सकाळ -सायंकाळ शेतामध्ये वाऱ्याच्या लहरीसंगे डोलणारी ही पिवळीजर्द फुले पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांची पावलेदेखील क्षणभर हे नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी जागेवर थबकत आहेत. विशेष म्हणजे मोहिरे यांनी या सूर्यफुलांच्या शेतीवर कोणतीही रासायनिक फवारणी न करता पूर्णपणे सेंद्रियखत पद्धतीने लागवड केली आहे.
सूर्यफुलाच्या शेतीसाठी मोहिरे यांना त्यांची पत्नी ग्रामसेविका तृप्ती, मुलगा यश यांचाही सहभाग असल्याचे नमूद केले. सूर्यफुलांच्या शेतीसाठी जैन ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्याने यासाठी मजूर नेमण्याची गरजच भासली नाही. अशा विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी शेतीकडे वेगळ्या नजरेने पाहिले तर शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी अनेक तरुण पुढे येतील, असे मत मोहिरे यांनी व्यक्त केले. शेतीमधील विविध प्रयोगांसाठी आपण शेतकरी आणि तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचेही मोहिरे यांनी सांगितले.
सन १९९५ ते २०११ या दरम्यान मातृमंदिरचे भाऊ नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विस्ताराचे मोठे काम उभे केले. त्याला उत्तम यश मिळाले. यामध्ये मोहिरे यांचा मोठा सहभाग होता. पुढील वर्षी संगमेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बियाणे देऊन सूर्यफूल शेतीसाठी प्रोत्साहित करणार असल्याचेही मोहिरे यांनी सांगितले. या शेतीला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भेटी देऊन पाहणी करत माहिती घेतली आणि समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT