Police constable written exam sakal
कोकण

Police Constable Exam : पोलीस शिपाई पदांसाठी 2 एप्रिलला लेखी परिक्षा

जिल्हा पोलिस दलातील २०२१ मधील रिक्त कॉन्स्टेबल ९९ पदांसाठी मैदानी ५ ते ११ जानेवारी कालावधीत जिल्हा पोलिस मैदानावर घेण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा पोलिस दलातील २०२१ मधील रिक्त कॉन्स्टेबल ९९ पदांसाठी मैदानी ५ ते ११ जानेवारी कालावधीत जिल्हा पोलिस मैदानावर घेण्यात आली होती.

ओरोस - जिल्हा पोलीस भरती २०२१ मधील पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या ११८८ उमेदवारांची लेखी परीक्षा २ एप्रिलला सकाळी ८.३० वाजता कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेज, कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक इंग्लिश स्कूल व कुडाळ हायस्कूल या तीन केंद्रांवर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे.

जिल्हा पोलिस दलातील २०२१ मधील रिक्त कॉन्स्टेबल ९९ पदांसाठी मैदानी ५ ते ११ जानेवारी कालावधीत जिल्हा पोलिस मैदानावर घेण्यात आली होती. २०२१ मधील रिक्त पदांच्या आधारे ही प्रक्रिया राबविली जात आहे. चालक पदाच्या २३ जागांसाठी दोन हजार १२६ तर कॉन्स्टेबल पदाच्या ९९ जागांसाठी ५ हजार ९५८ अर्ज आले होते. यातील चालक पदासाठी २ ते ४ जानेवारी कालावधीत तर कॉन्स्टेबल पदासाठी ५ ते ११ जानेवारी या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली होती.

यावेळी उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे एकास दहा या प्रमाणे लेखी परीक्षेसाठी प्रवर्ग व समांतर आरक्षण निहाय निवड यादी तयार करण्यात आली आहे. याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ९९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात असून एकूण ११८८ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेल्या ११८८ उमेदवारांच्या यादीत ९३१ पुरुष उमेदवारांची नावे आहेत.

५९ माजी सैनिक तर १९६ महिला उमेदवारांची नावे आहेत. लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र हे 'महाआयटी' मार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी दोन तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचण, समस्या असल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्षावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT