कोकण

फुकेरी हनुमंत गडावर मनसेकडून सौर दिवे

CD

swt3017.jpg
92461
फुकेरी : येथील हनुमंत गडावर सौर दिव्यांच्या लोकार्पण प्रसंगी मनसे पदाधिकारी.

फुकेरी हनुमंत गडावर
मनसेकडून सौर दिवे
सावंतवाडी, ता. ३०ः रामनवमीचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने फुकेरी येथील हनुमंत गडावर छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर सौर दिवे तसेच सौर मशाल दिव्यांचे लोकार्पण माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान सिंधुदुर्ग विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान यांच्या मागणीनुसार मनसेचे माजी तालुका सचिव आबा चिपकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. मनसे लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष गणेश कदम, सहसंपर्क अध्यक्ष सूर्यकांत मयेकर यांचे लक्ष वेधून यासाठी पाठपुरावा केला. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचे कदम यांचे आभार मानले. यावेळी माजी शहराध्यक्ष सुभेदार, माजी तालुका सचिव चिपकर, शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे, मनविसे तालुकाध्यक्ष स्वप्नील कोठावळे, तालुका उपाध्यक्ष दर्शन सावंत, प्रशांत तळकर, मयूर सावंत आदी पदाधिकाऱ्यांसह सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष राऊळ, दुर्गसेवक दिनेश सावंत, शुभम नाईक, एकनाथ गुरव, सिद्धेश धुरी आदी उपस्थित होते.
..............
सावंतवाडीत उद्या ज्येष्ठ नागरिक सभा
सावंतवाडीः ज्येष्ठ नागरिक संघाची सभा शनिवारी (ता. १) सकाळी १० वाजता ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, शिरोडा नाका, सालईवाडा सावंतवाडी येथे होणार आहे. सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अनंत माधव यांनी केले आहे.
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT