कोकण

राजापूर- लीलाताई मुकादम यांचे निधन

CD

फोटो

जनसंघच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या
लीलाताई मुकादम यांचे निधन
रत्नागिरी, ता. ६ : जनसंघ व भारतीय जनता पक्षच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या लीलाताई मुकादम (माई, वय 90) यांचे गुरुवारी (ता. 6) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पुत्र रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील निवृत्त अधिकारी अविनाश, सून, मुलगी, तसेच नातू-नातसुना, नाती-नातजावई असा मोठा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होते. लीलाताईंनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने सामान्य आर्थिक परिस्थितीत संसार उभा केला होता. संघ परिवार आणि जनसंघ यांच्या कार्यकर्त्यांची त्या नेहमीच विचारपूस करीत असत. संघाच्या कार्यकर्त्यांची कधी कधी त्यांच्याकडे जेवणाचीही व्यवस्था असे. जनसंघात सुरुवातीच्या काळात महिला मोजक्याच कार्यकर्त्या होत्या. त्यापैकी माई या एक होत्या. त्या काळातील अहिल्या पटवर्धन, सुमन केतकर, हेमप्रभा जोशी, मंगलाताई भावे आदी कार्यकर्त्यांबरोबर माई मुकादम याही जनसंघाच्या महिला आघाडीचे काम करीत होत्या. आज त्यांच्या निधनाने जनसंघाच्या जुन्या महिला कार्यकर्त्यांमधील शेवटचा दुवा संपला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT