कोकण

कोकण रेल्वेच्या आणखी दोन ‘समर स्पेशल’ गाड्या

CD

कोकण रेल्वेच्या आणखी
दोन ‘समर स्पेशल’ गाड्या
सावंतवाडी, ता. ७ ः उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांबरोबर या आधीच काही समर स्पेशल गाड्या जाहीर केलेल्या असताना त्यामध्ये आता आणखीन दोन गाड्यांची भर पडली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर जाहीर करण्यात आलेल्या नव्या समर स्पेशल गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५ एप्रिल ते ३ जून २०२३ या कालावधीत दर शनिवारी सोडण्यात येणार आहे. त्या दिवशी ही गाडी रात्री एक वाजून दहा मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी ती गोव्यात कर्मळीला दोन वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. करमाळी येथे लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर धावताना ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून ४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल. दुसरी समर स्पेशल विशेष गाडी पुणे ते एर्नाकुलम दरम्यान सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. ही गाडी १३ एप्रिल ते २५ मे २०२३ या कालावधीत आठवड्यातून एकदा धावणार आहे. या कालावधीत पुणे येथून ही गाडी दर गुरुवारी सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी एर्नाकुलमला पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास शुक्रवारी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल. ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासरगोड, कन्नूर, थलास्सेरी, कोझिकोडे, तिरूर, शोरनूर जंक्शन आणित्रिसूर या स्टेशनवर थांबणार आहे.
---
बाजारपेठेत मिरची खरेदीसाठी गर्दी
सावंतवाडी ः मसाल्याचे विविध प्रकारचे पदार्थ खरेदी करण्यासाठी सध्या गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. बाजारात मिरची खरेदीसाठी गर्दी होत आहे. विविध कंपन्यांचे तयार मसाले परवडत नसल्याने मिरची खरेदी करून त्याचा मसाला बनवण्यावर गृहिणींचा कल आहे. पावसाळ्यापूर्वी मसाले बनवण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. विविध कंपन्यांच्या तयार मसाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक मसाल्यांमध्ये मिलावट केली जात असल्यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे तयार मसल्याऐवजी संकेश्वरी, बेडगी, काश्मिरी, गंटूर, लवंगी, कोल्हापुरी अशा विविध प्रकारची मिरची खरेदी करणे त्याचबरोबर धणे, बडीशेप, तमालपत्र, शहाजिरे, मोहरी, हळकूंड आदी जिन्नस खरेदी करून घरगुती मसाला तयार करण्याला पसंती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ महिलांचा जागीच मृत्यू; ४ गंभीर जखमी

NATO कागदी वाघ! रशियालाही माहितीय, आता अमेरिकेनं बाहेर पडलं पाहिजे; युद्धात एकटं पाडल्यानं ट्रम्प संतापले

Latest Marathi News Live Update : पैशांच्या वादातून मित्रानेच केला तरुणाचा खून

Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT