कोकण

सर्वसामान्याना देणार घर खरेदीची संधी

CD

(टुडे पान ३ साठीमेन)
-rat९p३९.jpg-
९४७९०
संतोष तडसरे
-
चिपळुणातील सर्वसामान्याना घर खरेदीची संधी

संतोष तडसरे ; चिपळूण क्रीडाईच्या अध्यक्षपदी निवड

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः आगामी कालावधीत सर्वप्रथम क्रीडाईच्या स्वमालकीची वास्तू उभी करणे, चिपळूण शहरात टीडीआरची अंमलबजावणी करिता शासन दरबारी प्रयत्न करणे, हायराईज बिल्डिंग बांधण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करणे, बांधकाम व्यवसायाच्या उन्नतीकरिता व माहितीसाठी विविध शिबिरे, तसेच प्रॉपर्टी महोत्सव आयोजन करून चिपळूणमधील सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मनोदय चिपळूण क्रीडाईचे नवनिर्वचित अध्यक्ष संतोष तडसरे यांनी व्यक्त केला.
देशभरातील २८ राज्य २१७ शहरे आणि १३००० पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी क्रीडाई ही संघटना आहे. चिपळूण येथील या संघटनेची बैठक उड्स रिसॉर्ट अलगोली येथे झाली. यावेळी २०२३ ते २०२५ या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष म्हणून संतोष तडसरे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यानी आपला अजेंडा सांगितला. तडसरे यांनी बांधकाम व्यवसायातील होणारे नवीन कायदे सांगितले. बांधकाम व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
बैठकीत प्रथम क्रीडाई महाराष्ट्राच्या सहसचिवपदी राजेश वाजे यांची निवड झाल्याबद्दल क्रीडाई चिपळूणतर्फे अभिनंदन करण्यात आले. माजी अध्यक्ष जावेद दलवाई यांनी नवीन कार्यकारिणी सूचित केली. उपाध्यक्ष समीर मेमन, रवींद्र कुलकर्णी, प्रवीण पटेल, शकीलशेठ मुकादम यांची निवड करण्यात आली. सचिवपदी शकील चौगुले, सहसचिव प्रसाद खातू, खजिनदार पदासाठी राहुल काळे, सह खजिनदार मन्सूर देसाई यांना संधी देण्यात आली. तसेच सल्लागार म्हणून शामकांत कदम, जावेद दलवाई, जयद्रथ खाताते, इकबाल अरकाटे, विनय काळी यांची नियुक्ती करण्यात आली. क्रीडाईचे कमिटीपदी जावेद दलवाई, सूचित पटेल, प्रकाश देसाई. टी. के. अनिलकुमार, रफिक चिलवान यांची निवड घोषित करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा २४ एप्रिलला पेढांबे येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT