कोकण

-शेतकरी मेळाव्याला कादिवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

(टुडे पान ३ साठी)

शेतकऱ्यांना वाशिष्ठी मदत करेल

प्रशांत यादव ः कादिवलीतील मेळाव्यात शेतकरी महिलांचा सत्कार

चिपळूण, ता. १० ः शेतकऱ्यांच्या पाठबळामुळेच वाशिष्ठी डेअरीची उत्पादने अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने बळ दिले जाईल. त्यांना समृद्ध करण्यासाठी जे काही देता येणे शक्य आहे, ते सर्व वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून देऊ, असे आश्वासन वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सचे संचालक प्रशांत यादव यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले.
वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सचा पहिला शेतकरी मेळावा तथा दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन मार्गदर्शन मेळावा दापोली तालुक्यातील कादिवली-गोपाळवाडी येथे झाला. या मेळाव्याला दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यादव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना वाशिष्ठी डेअरीच्या प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच, दुग्धोत्पादनात यशस्वी भरारी कशी घेता येईल याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना दुधाला योग्य हमीभाव दिला जाईल. तसेच बोनस आणि इतर सोईसुविधा दिल्या जातील. एकाही शेतकऱ्याची फसगत होणार नाही. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जपण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाहीही यादव यांनी दिली. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनात अधिक मोठ्या प्रमाणात बळ मिळावे, योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित केला होता.
मेळाव्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर दळवी, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालिका स्वप्ना यादव, कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता बी. जी. देसाई, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त मुकुंद लोंढे, गटविकास अधिकारी रूपा दिघे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप थेटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी दूध उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिल्पा महाडीक, ज्योत्स्ना मर्चंडे, रूबिना जोगीलकर या शेतकरी महिलांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराची निवृतीची घोषणा; म्हणाला, बाबर आझमसारखा...'

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : FASTag वार्षिक पास आता महागला! १ एप्रिलपासून अंमलबजावणी

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

SCROLL FOR NEXT