कोकण

वणवे रोखण्यासाठी ''रानमित्र''ची जागृती

CD

वणवे रोखण्यासाठी ‘रानमित्र’ची जागृती
आचऱ्यात संस्थेचा उपक्रमः पर्यावरण संवर्धनासाठी २०१९ पासून पुढाकार
अर्जुन बापर्डेकरः सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १०ः अलीकडील काळात आपण विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहोत. त्यातच निसर्गाची हानी करणारे कारनामे मानवाकडून जाणीवपूर्वक होत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखणे आपल्या हातात आहे; मात्र ज्या खबरदारी घ्यायला पाहिजेत, त्या घेतल्या जात नसल्याने ''लाखमोलाचे काम करूया, पर्यावरणाचा समतोल राखुया'' ही ब्रीदवाक्य घेऊन आचऱ्यातील ''रानमित्र आचरा'' या संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी २०१९ पासून पुढाकार घेतला आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. वाढलेली उष्णता, सोसाट्याचा वारा, मानवाचा वाढलेला बेजबाबदारपणा ही वणव्याची मुख्य कारणे आहेत. आगीमध्ये काजू, आंबा-काजू कलम बागा, पाळीव प्राणी तसेच जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. बहुमुल्य औषधी झाडे, दुर्मिळ पक्ष्यांची अंडी व सरपटणारे प्राणी जळून जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध अशा जैवविविधतेसाठी सर्वत्र ओळखला जातो; परंतु जंगलाला निरुपयोगी समजून जाणीवपूर्वक आग लावली जाते. किंबहुना चुकून लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नही केला जात नाही, ही शोकांतिका आहे, असे ''रानमित्र''चे शिलेदार सांगतात.
ग्रामसभा व सोशल मीडिया तसेच अन्य समाजमाध्यमांतून गावातील लोकांमध्ये वणव्यांबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. बेजबाबदारपणे आग लावून शेतकऱ्यांचे व जैवविविधतेचे नुकसान करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणीही ''रानमित्र''कडून करण्यात आली आहे. या संस्थेकडून आचरा परिसरात भित्तीपत्रके तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन करण्याबाबात आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेत अनेकांना सामावून घेतले जात आहे.
................
चौकट
वणवा लागला तर?
* जंगल संपत्ती वाचविण्याचा प्रयत्न करा.
* गरज असल्यास मर्यादित आग लावून झाल्यावर ती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची खात्री करावी.
* जळती सिगारेट बेजबाबदारपणे कोठेही टाकू नये.
* कितीही गरजेचे असले तरी दिवसाच्यावेळी आग लावू नये.
* कोठेही आग लागलेली दिसल्यास तत्काळ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा किंवा आग आटोक्यात येत नसल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT