कोकण

आंदुर्लेत उद्यापासून विविध कार्यक्रम

CD

swt१०२.jpg
९४७९२
श्री देवी आंदुर्लाई

आंदुर्लेत उद्यापासून विविध कार्यक्रम
देवीचा वाढदिवस सोहळाः खेळ पैठणीचा, दशावतार, भजनांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः तालुक्यातील आंदुर्ला येथील श्री देवी आंदुर्लाई मातेचा वाढदिवस सोहळा बुधवार (ता. १२) ते शुक्रवार (ता. १४) या कालावधीत होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बुधवारी (ता.१२) सकाळी ८ वाजता श्रींची अभिषेक पूजा, कुंकुमार्चन व लघुरुद्र, ८.३० वाजता अश्वत्थ उद्यापन सोहळा, सकाळी ११.३० वाजता श्रींची महापूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद व नैवेद्य, ३ वाजता हरिपाठ (विलास रेवंडकर व सहकारी, मुणगी), सायंकाळी ५ ते ७ स्थानिक ग्रामस्थांची भजने, रात्री ७.३० ते ९ श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा, रात्री १० वाजता स्थानिक महिला व शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कलाविष्कार ''रंगवेध आंदुर्ले २०२३'',
गुरुवारी (ता. १३) सकाळी ७ वाजता श्रींची अभिषेक पूजा व कुंकुमार्चन, ८ वाजता नवचंढी अनुष्ठान, पुण्याह वाचन, देवता स्थापन, एकादशण्या व ओट्या भरणे, ११ वाजता श्रींची महापूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद व नैवेद्य, ३ ते ५.३० वाजता महिलांसाठी खास ''खेळ पैठणीचा'' आणि हळदीकुंकू, सायंकाळी ५.३० ते ७.३० वाजता स्थानिक व निमंत्रित भजने, रात्री ७.३० ते ९ श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता श्री देवी आंदुर्लाई युवक मित्रमंडळ आयोजित ओंकार कलामंच सावंतवाडी निर्मित ''कलाविष्कार'' कार्यक्रम, शुक्रवारी (ता. १४) सकाळी ७ वाजता श्रींची अभिषेक पूजा व कुंकुमार्चन, सकाळी ८ वाजता नवचंढीहवन, कुंकुमार्चन व पुर्णाहुती, एकादशण्या व ओट्या भरणे, ११ वाजता श्रींची महापूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद व महानैवेद्य, १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ स्थानिक व निमंत्रित भजने, ६ ते ८ फुगडी कार्यक्रम (श्री देवी आंदुर्लाई महिला फुगडी मंडळ), रात्री ८.३० वाजता श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व दिंड्या, फटक्यांची आतषबाजी, ११.३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ले यांचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. श्री देवी आंदुर्लाई देवीच्या वाढदिवस उत्सव सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहून आशीर्वाद तसेच तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी आंदुर्लाई पंचायतन मंडळ, इर्तिक व आंदुर्ले ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT