कोकण

सांगलीतील गांडुळखत प्रकल्पास आंदुर्लेतील महिला गटाची भेट

CD

swt104.jpg
94794
सांगलीः येथील दिशा स्वयंसहाय्यता महिला गटाने कवठेमहांकाळ येथे भेट दिली.

सांगलीतील गांडुळखत प्रकल्पास
आंदुर्लेतील महिला गटाची भेट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः तालुक्यातील आंदुर्ले गावातील दिशा स्वयंसहाय्यता महिला गटाने सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील उमेद अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती (सीआरपी) यांची अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट घेतली. अभ्यास दौऱ्यात त्यांनी गांडुळखत निर्मिती प्रकल्पास भेट देत माहिती घेतली.
दिशा गटाने उत्पादन होणाऱ्या मालाची सिंधुसरस, गोवा सरस (मडगाव, गोवा), महालक्ष्मी सरस (मुंबई-बांद्रा) येथे विक्री केलेला आहे. दिशा गटाच्या या कार्याची विशेष दखल घेऊन राज्यपाल आणि महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते कोकण विभागातील मानाचा राजमाता जिजाऊ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या गटाने आपल्या चार गांडुळखत बेडची संख्या आता दहापर्यंत आणली आहे. त्यांच्या या कार्यास माजी सरपंच संतोष पाटील व पूजा सर्वेकर यांचे विशेष योगदान व मार्गदर्शन लाभले.
या अभ्यास दौऱ्यांतर्गत कवठेमहांकाळ तालुका समन्वयक संदीप धोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट दिली. धोकटे यांनी यापूर्वी कुडाळ तालुका समन्वयक म्हणून उत्कृष्ट काम करून आपल्या कामातून महिला गटांना माहिती व मार्गदर्शनात विशेष ठसा उमटविला आहे. कवठेमहांकाळ तालुका पंचायत समितीमधील विनायक जाधव, उमेश कौलगे, बाळु कांबळे, रेश्मा आठवले व तालुक्यातील १७ सीआरपी, बॅंकसखी यांनी अभ्यास दौऱ्यासाठी भेट दिली. कुडाळ तालुक्यातील ''उमेद''मधून तालुका कृषी व्यवस्थापक रसिका राणे, प्रभाग व्यवस्थापक समीक्षा धुरी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT