कोकण

-संघटनेच्या रिक्षा स्टॉपचे अनावरण

CD

स्वाभिमान रिक्षा चालक- मालक
संघटनेच्या रिक्षा थांब्याचे उद्घाटन
रत्नागिरी, ता. १० : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जयस्तंभ येथे रिक्षा थांब्याचे अनावरण करण्यात आले. भाजपा प्रणित स्वाभिमान रिक्षा चालक- मालक संघटना संलग्न महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर व रिक्षा संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रत्नागिरी भाजपा महिला मोर्चा ओबीसी सेलच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा प्राजक्ता रुमडे आणि ज्येष्ठ रिक्षा व्यवसायिक शरद पालकर यांनी श्रीफळ वाढवून आणि भाजपा जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी विजय सालीम यांनी फित कापून स्टॉपचे उदघाटन केले.
त्यानंतर शहरातील ठिकठिकाणी रिक्षा व्यवसायिकांना लाडूचे वाटप करण्यात आले. या वेळी प्राजक्ता रुमडे, विजय सालीम, कामगार संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष लिलाधर भडकमकर, भाजपा प्रणित स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, शैलेश बेर्डे, दादा ढेकणे, जयसिंग राऊत, प्रवीण रुमडे, दीनदयाळ सुखठणकर, सागर शिवगण, राजेश झगडे, सुभाष पवार, अनिल पावसकर, रिक्षा संघटनेचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष सुहास लिंगायत, राजेश भाटकर, सदा सुर्वे, शरद पालकर, अमर पाटील, सुहास लिंगायत, महेंद्र शिंदे, नवनाथ कुड, रिजवान नेवरेकर, अवधूत आमकर, तेजस पावसकर, स्वरूप राऊत, समीर पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT