कोकण

मुख्याध्यापकांचे राज्यव्यापी अधिवेशन

CD

-rat१०p२६.jpg-
९४८३३
रत्नागिरी : बोलताना प्रवीण मोरे. सोबत जिल्हाध्यक्ष दीपक घवाळी, विनोद नारकर, आसक्ती भोळे, प्रकाश कदम आदी.
-
खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांचे अधिवेशन

रत्नागिरीत आयोजन ; २३ एप्रिलला शिक्षणमंत्र्यांसह मंत्री येणार

रत्नागिरी, ता. १० : महाराष्ट्र राज्यातील खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या २३ एप्रिलला रत्नागिरीत होणार आहे. त्याकरिता शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत व अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या रत्नागिरी शाखेने अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दीपक घवाळी यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण व रत्नागिरी येथे तालुकास्तरीय सभा घेण्यात आल्या. त्या वेळी अधिवेशन यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्री. घवाळी यांनी शिक्षक बंधू - भगिनींना मार्गदर्शन केले. विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. चिपळूण तालुका अध्यक्ष रमेश कदम, रत्नागिरी तालुका अध्यक्ष प्रकाश कदम, मुख्याध्यापक विनोद नारकर, सुनील डांगे, मुख्याध्यापिका आसक्ती भोळे, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू - भगिनी उपस्थित होते.
अधिवेशनाला मंत्र्यांसमवेत खासदार विनायक राऊत, महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षा व विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, चिपळूण - संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, लांजा - राजापूरचे आमदार राजन साळवी, दापोलीचे आमदार योगेश कदम, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार बाळासाहेब माने तसेच राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र निकम, मुख्य सचिव विठ्ठल उरमुडे, महासंघाचे माजी अध्यक्ष व प्रमुख सल्लागार श्री. तुंगार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात महासंघाच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या जातील, असा विश्वास सर्वांना आहे. एकूणच जिल्हा व तालुका कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अधिवेशनाला राज्यातील जास्तीत जास्त खासगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT