कोकण

डॉ. जुईची वैद्यकीय क्षेत्रात गगन भरारी

CD

swt१०११.jpg
९४८३८
डॉ. जुई निगुडकर
swt१०१२.jpg
९४८३९
डॉ. जुई, वडील डॉ. संजय निगुडकर, आई सुमेधा, डॉ. राशिका, डॉ. सुजय आदी कुटुंबीयांसोबत.

डॉ. जुईची वैद्यकीय क्षेत्रात गगन भरारी
‘पीजी नीट’मध्ये सातवी रॅंकः प्रेरणादायी ठरावी अशी वाटचाल
अजय सावंतः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ः वैद्यकीय क्षेत्रात अवकाशाला गवसणी घालणारे उतुंग यश डॉ. जुई निगुडकर हिने मिळविले असून रेडिओलॉजिस्ट बनणे, ही तिची पहिली पसंती आहे. तिने पोस्ट ग्रॅज्युएट नीट (PG NEET) मध्ये ८०० पैकी ७१६ गुण मिळवून ऑल इंडिया स्तरावर सातवी रँक मिळविली आहे. मोठे यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे, असा संदेश यानिमित्ताने तिने दिला आहे.
कुडाळ हिंदू कॉलनीतील श्री गणेश हॉस्पिटलचे डॉ. संजय गणेश निगुडकर यांची डॉ. जुई ही सुकन्या आहे. संपूर्ण देशभरातील एमबीबीएस उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एमडी, एमएस, डीएनबी अशा पदव्युत्तर शिक्षणासाठी ही परीक्षा देतात. यावर्षी सुमारे २ लाख ८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात डॉ. जुई हिने सातवा क्रमांक पटकावला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ''रुग्णसेवा हीच परमेश्वर सेवा'' मानून ती वाटचाल करीत आहे.
डॉ. जुई ही जीएस मेडिकल कॉलेज येथे शिकत होती. तेथे ती सुमारे ७४ टक्के गुण मिळवून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाली. सध्या ती केईएम रुग्णालय येथे इंटर्नशिप करीत आहे. तिच्या या देदीप्यमान यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. जुई हिने दहावीपर्यंतचे शिक्षण केएमएसपी इंग्लिश मीडियम स्कूल येथून पूर्ण केले. तेथेही ती सातत्याने आपले प्रथम स्थान टिकवून असायची. दहावीला तिने ९८ टक्के गुण मिळविले होते. त्यानंतर तिने अकरावी आणि बारावी मुंबई येथून पूर्ण केली आणि यूजी नीटमध्ये ७०० पैकी ६०१ गुण मिळवून महाराष्ट्रातील प्राधान्याने प्रथम असलेल्या सेठ जीएस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतरही ती आपल्या वैद्यकीय अभ्यासात सतत अव्वल स्थान मिळवत गेली. एमबीबीएसची परीक्षा मे २०२२ मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर इंटर्नशिप करताना तिने ''पीजी नीट''चा अभ्यास केला आणि या खडतर परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले. या यशात अथक परिश्रम, चिकाटी तसेच संपूर्ण कुटुंबाचा विशेषतः आपल्या आईचा मोलाचा सहभाग होता, असे ती आवर्जून सांगते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रवेश परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंतची सर्वात अव्वल रॅंक डॉ. जुई हिने मिळविली असून त्याबद्दल सिंधुदुर्गवासी, विविध डॉक्टर्स संघटना यांच्याकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे.
डॉ. जुईचे वडील डॉ. संजय निगुडकर हे कुडाळ येथे गेली तीस वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवा देत असून तिची आई हॉस्पिटलचे व्यवस्थापन सांभाळते. तिचा भाऊ डॉ. सुजय निगुडकर व वहिनी डॉ. राशिका गर्ग हे २०२१ मध्ये सायन- मुंबई हॉस्पिटलमधून स्त्रीरोग व प्रसुती शास्त्राची (एमएस ओबीजीवाय) अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाले. उभयतांनी कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयात सेवा देण्यासाठी रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या कुटुंबाचा हा वैद्यकीय शैक्षणिक वारसा डॉ. जुईनेही जपलेला आहे. तिने केवळ अभ्यासातच विशेष प्रावीण्य मिळविलेले नाही तर ती नृत्य, संगीत, चित्रकला यामध्येही पारंगत आहे. तिचे एक यूट्यूब चॅनेल असून त्यात तिने अनेक गाणी सादर करून आपल्या कलेला व्यासपीठ मिळवून दिले आहे.
.............
कोट
मी प्राथमिक शाळेत असताना कुठलीही स्पर्धा परीक्षा सोडली नाही. निकाल किंवा गुणांचा विचार करू नकोस, स्पर्धा परीक्षा देण्याची सवय लावून घे, असे बाबांनी मला सांगितले होते. चौथीतील स्कॉलरशिप होमी भाभा, एमटीएसएनटीएस त्याचप्रमाणे आणखी बऱ्याच स्पर्धा परीक्षा मी सातत्याने देत होते. त्यात यश मिळवत होते. या स्पर्धा परीक्षांमुळे मला अभ्यासातील आव्हाने स्वीकारायची सवय झाली. जिल्हा सोडून पुढील शिक्षणासाठी ज्यावेळी मी मुंबईत गेले, तेव्हा तिथे मी कुठेच कमी पडले नाही. मी अभ्यासात नेहमी सातत्य ठेवले. आई-बाबा सांगतात म्हणून नव्हे, तर मला माझे उद्दिष्ट गाठायचे आहे, हे मनात ठेवून मी अभ्यासात मेहनत घेतली. स्वतःवर विश्वास ठेवला. ध्येय निश्चित केले आणि त्यामुळेच हे उत्तुंग यश गाठू शकले.
- डॉ. जुई निगुडकर
................
कोट
हे यश एवढे मोठे आहे की, याबाबत काय प्रतिक्रिया द्यावी, हेच समजत नाही. हे अकल्पित यश म्हणजे जणू काही ''आयसिंग ऑन द केक'' असे मला वाटते. आम्हाला खूपच आनंद झालाय. हे बावन्नकशी यश आहे. या यशाची अपेक्षा तिच्याकडून होतीच; पण तिच्यावर दबाव येऊ नये, म्हणून ही इच्छा तिच्याकडे बोलून दाखवत नव्हतो. माझ्या मुलीने माझी इच्छा पूर्ण केली. तिने जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर यशाला गवसणी घातली.
- डॉ. संजय निगुडकर
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT