कोकण

महामार्ग मोबदल्यासाठी प्रकल्पबाधित सात वर्षे प्रतिक्षेत

CD

( पान ५ मेन)

महामार्ग मोबदल्यासाठी सात वर्षे प्रतिक्षेत

रत्नागिरी तालुका ; निवाडा रक्कम सदोष ; टप्पे केल्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः रत्नागिरी तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत प्रकल्पबाधित मालकांना राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सात वर्षांपासून पुरवणी निवाडा रक्कम देणे बाकी आहे. बाधित जमिनी व बांधकामे, झाडे यांच्या संपादनाच्या पहिल्या टप्प्यात शासनाने घोषित केलेली निवाडा रक्कम ही सदोष असल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाची ३ ‘क’ची प्रक्रिया झाल्यावर झाडे व बांधकामे, इतर संसाधने यांची मोजमापे घेऊन त्याचे मुल्य निश्चिती कारायचे होते. काही ठिकाणी स्थानिकांचा विरोध झाल्याने पोलिस बंदोबस्तात मोजणी करण्यात आली. शासकीय विभागाकडून संपादनाची रूंदी वेळेत निश्चित न केल्याने मुल्यांकनासाठी काही प्रकरणांत ३ ‘ड’चा निवाडा घोषित झाला. त्यामध्ये सदोष मुल्यांकनासाठी राष्ट्रीय महामार्ग लवाद न्यायाधिकरणाकडे दावे करण्यात आले. तेथे सुनावणी होऊन मंजूर दाव्यांची रक्कम सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभागाने द्यावयाचे निश्चित झाले. त्याला बांधकाम विभागाच्या नवी मुंबई बेलापूर येथील कार्यालयाकडून मंजुरीसंदर्भात त्रुटी काढण्यात आल्याने विलंब होत आहे. त्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता सक्षम प्राधिकारी राष्ट्रीय महामार्ग यांनी केलेली आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या लवाद रकमेबाबत पाच वर्षे होऊनही कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. मोबदला रक्कम देणे असूनही संबधित बांधकामे जबरदस्तीने तोडावयास लावण्यात आल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. लवाद न्यायाधिकरणाने नव्याने मंजूर केलेल्या दाव्यांपैकी अनेक गावातील मोबदला रक्कम अजून प्रकल्पबाधितांना देणे आहे. प्रकल्पबाधितांची मोबदला रक्कम सात वर्षांपूर्वी मंजूर होऊनही ती मिळत नसल्याने त्यांना पर्यायी व्यवस्थाही करता येत नाही.
--

दोन वर्षापूर्वी वितरित
याच गावातील काही प्रकल्प बाधितांना मोबदला रक्कम मंजूर झाली आहे. ती त्या प्रकल्प बाधितांना दोन वर्षापूर्वी वितरित झाली. एकाचवेळी मंजूर झालेल्या रक्कम वाटपात टप्पे केल्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे लवाद पुरवणी निवाडा रक्कम बाधितांना तातडीने देण्याची मागणी पालीतील प्रकल्पबाधित करत आहेत.
-
कोट
पाली गावातील काही प्रकल्पबाधितांना रक्कम न मिळल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे लवाद पुरवणी निवाडा रक्कम बाधितांना तातडीने देण्याची मागणी करत आहोत अन्यथा पुन्हा काम बंद आंदोलन करावे लागेल.
- मदन जाधव, ग्रामस्थ, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : लोणार सरोवरासाठी 9.88 कोटींचा निधी मंजूर

Satara News: साताऱ्यात मृतदेहांची अदलाबदल;एकाच स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार,हलगर्जीप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित!

Chhatrapati Sambhajinagar: ‘मार्च एंड’ला रात्री बिलांचा पाऊस; कोषागार कार्यालयात कधी नव्हे एवढी लगबग; कोट्यवधी रुपये केले अदा

SCROLL FOR NEXT