कोकण

यशस्वी कलाकार होण्यासाठी निरिक्षण महत्वाचं

CD

कलाकाराला निरीक्षण महत्वाचं

अभिनेते संजय खापरे ः अभिनेता म्हणजे एखादे स्टोअर

चिपळूण, ता. १० ः यशस्वी कलाकार होण्यासाठी निरिक्षण महत्वाचे असते. आजुबाजूला घडणारे प्रसंग, दिसणाऱ्या व्यक्ती, त्यांचे हावभाव, बोलणं यातून कलाकाराला खूप काही मिळत असतं. जो अशाप्रकारे आजुबाजूला घडणाऱ्या घटना, व्यक्ती यांचं निरीक्षण करतो तो यशस्वी कलाकार होऊ शकतो, असं मत आघाडीचे अभिनेते खापरे यांनी मांडले.
येथील भावार्थ पुस्तकालयाच्यावतीने नाट्यकट्टा उपक्रमांतर्गत शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात अभिनेते खापरे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रियंका तेंडुलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून खापरे यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास उलगडला गेला. ''गाढवाचं लग्न'' या चित्रपटात काम करताना व्यायाम सोडून द्यावा लागला. माझी आत्या बोलताना जसे हावभाव करायची त्याचे निरीक्षण करून मी त्याचा उपयोग यातील पात्र साकारताना केला. दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर डायनामिक आहेत. दे धक्का व अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी मला संधी दिली व मी त्या संधीचे सोनं केलं. काकस्पर्श या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला मी गेलो तेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांनी ''तू छान काम करतोस, तुला मी फॉलो करते, यदा कदाचितपासून फक्त लढ म्हणापर्यंत मी तुला फॉलो करत आहे'', असं त्यांनी सांगितलं. तेव्हा माझ्या कामाचं चीज झालं असं मला वाटलं, अशी भावना खापरे यांनी व्यक्त केली. अभिनेता म्हणजे एखादे स्टोअर आहे. स्टोअरमध्ये सगळं ज्या पद्धतीने मिळतं त्याच पद्धतीने कलाकाराला सगळं आलं पाहिजे. सिनेमातील भाषा त्याला यायला हवी, असे सांगताना काकस्पर्शमधील फडके नावाची भूमिका साकारताना ती भाषा मला आत्मसात करावी लागली, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT