कोकण

चिपळूण-अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी कोयना सज्ज

CD

अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी कोयना सज्ज

संजय चोपडे ; कडक उन्हाळ्यामुळे मागणी वाढली

चिपळूण, ता. १० ः राज्यात विजेची मागणी वाढल्यास कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यासाठी प्रकल्प सज्ज असल्याची माहिती मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी ''सकाळ''ला दिली.
राज्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विजेची मागणीही वाढली आहे. काही दिवसांपूर्वी विजेची मागणी २४ हजार मेगावॅटपर्यंत गेली होती. महानिर्मिती कंपनीला ही मागणी पूर्ण करताना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागली. मे महिन्यात विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या मागणीला तोंड देताना यावर्षी पुन्हा कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती करण्याची वेळ येणार आहे. कोयना प्रकल्पातील एकूण ६७.५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. गेल्या वर्षी विजेची मागणी वाढल्यानंतर कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती झाली होती. आरक्षित पाणीसाठा वापरून आणखी १५ टीएमसी पाणी धरणातील शिल्लक साठ्यापैकी वीजनिर्मितीसाठी वापरण्यात आला होता. यावर्षी कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मितीच्या सूचना शासनाकडून आलेल्या नाहीत; मात्र मे महिन्यात कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती करण्याची सूचना शासनाकडून येऊ शकते या पार्श्वभूमीवर कोयना प्रकल्प अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. प्रकल्पातून एकूण २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. प्रकल्पाचे चारही टप्पे मागणीच्या वेळी सुरू केले जातात. या वेळी मे महिन्यात अतिरिक्त वीजनिर्मितीची मागणी झाल्यास चारही टप्पे अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी उपलब्ध असल्याचे चोपडे यांनी सांगितले.


कोट
कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती करायची म्हटले तर त्यासाठी जादा पाण्याची आवश्यकता आहे. शिल्लक पाणीसाठ्यापैकी काही टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी मिळाले तर अतिरिक्त वीजनिर्मिती करता येईल; मात्र पाणी वापराबाबत अजून शासनस्तरावर कोणत्याही सूचना नाहीत. तशा सूचना आल्या तर आम्ही अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी तयार आहोत.
- संजय चोपडे, मुख्य अभियंता, महानिर्मिती कंपनी, पोकळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Price Hike : चहा महागला! युद्धाचा फटका थेट चहावर; प्रति कप ₹1 दरवाढ

IPL VIP Tickets : सामान्य प्रेक्षकांसारखे रांगेत उभे राहावे लागू नये, आमदारांचा मोफत तिकिटांसाठी ‘खेळ’… मोदींच्या वक्तव्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये अंबप रोडवर भीषण आग; शेती आणि झाडांना मोठा फटका

AI Courses : घरबसल्या फ्रीमध्ये शिका AI अन् मिळवा लाखोंची नोकरी, सरकारकडून १५,००० स्कॉलरशिप, काय योजना आहे पाहा

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT