कोकण

-पोसरे येथे हुंबरे कुटूबियांकडून दिव्यांगासाठी साहित्य वितरण

CD

-rat१०p३५.jpg ः
९४८९६
चिपळूण ः पोसरे येथे सुभाष हुंबरे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात आले.
-

हुंबरे कुटुंबीयांकडून दिव्यांगासाठी साहित्य

चिपळूण, ता. १० ः सुभाष जानू हुंबरे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांकडून गावातील दिव्यांग व्यक्तींना मोफत व्हीलचेअर, वॉकरस्टिक, वॉकरचे नवीन गावदेवी मंदिरात वाटप करण्यात आले. जे लाभार्थी मंदिरात येऊ शकले नाहीत त्यांना त्यांच्या घरोघरी जाऊन साहित्य वितरित करण्यात आले. श्री देवी नवलाई, वाघजाई, खेम, लखोबा देवस्थान पोसरे, एकता प्रतिष्ठान पोसरे, (कै.) जानू बाबाजी हुंबरे व (कै.) सौ. अनुसया जानू हुंबरे यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम राबवण्यात आला.
ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण देणे लागतो, या विचाराने हुंबरे कुटुंब प्रेरित असून प्रतिकूल परिस्थितीत समाजाने केलेल्या ऋणाची उतराई म्हणून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यसेवेत शक्य होईल ती जबाबदारी पेलून हे परिवार समाजहित जोपासत आहेत. अनेक गरजूंना उत्तम आरोग्य सेवेचा लाभ देऊन कोरोनासारख्या काळात अनेकांचे प्राण वाचवले आहेत. हे कुटुंब एकत्रित असून विविध सामाजिक संस्थांमधून त्यांची सक्रिय जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन सुरू आहे. या वेळी सरपंच महेश आदवडे, गावचे अध्यक्ष गोविंद तांदळे, सोमा आदवडे, नारायण मेस्त्री, जयराम माळी, पांडुरंग मेस्त्री आदी उपस्थित होते. या वेळी दोन व्हीलचेअर, दहा वॉकर, ४२ वॉकर स्टिकचे गावातील गरजू व्यक्तीच्या घरी जाऊन वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

SCROLL FOR NEXT