हरदीप सिंग पुरी राज्यसभेची पोटनिवडणूक लढणार, भाजपने उमेदवारी केली जाहीर

Hardeep Singh Puri: भाजपने मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या नावाची घोषणा केलीय. मुरूगन यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
union Minister Hardeep Singh Puri

union Minister Hardeep Singh Puri

Esakal

Updated on: 

Hardeep Singh Puri: एल मुरूगन यांनी केंद्रीय मंत्रिपदासह राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या नावाची घोषणा केलीय. हरदीप सिंह पुरी यांची उमेदवारी भाजपने जाहीर केलीय. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं हरदीप सिंह पुरी यांच्या नावाला मंजुरी दिलीय. एल मुरूगन हे मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com