कोकण

भुईबावड्यात वादळी पाऊस

CD

९४९०१
पान एक
भुईबावड्यात वादळी पाऊस
अनेक भागांत नुकसान; पूर्व पट्ट्यातील आंबा हंगाम धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १० ः जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचे धूमशान सत्र सुरूच आहे. काल (ता. ९) रात्री उशिरा कणकवली तालुक्यातील काही गावांत पाऊस झाल्यानंतर आज सायंकाळी भुईबावडा परिसराला वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला असून या पावसामुळे जिल्ह्यातील पूर्वपट्टयातील आंबा हंगाम धोक्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक भागांत तर वादळामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. काल देखील जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. रात्री उशिरा कणकवली तालुक्यातील शिवडाव, कनेडी, फोंडा या भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. आज सकाळपासून जिल्ह्यात प्रचंड उष्मा वाढला होता. दुपारी ३ वाजल्यापासून वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा, ऐनारी, भुईबावडा घाट, करुळ घाट, तिरवडे तर्फे खारेपाटण या परिसरात विजांचा कडकडाट सुरू झाला. वादळी वारे वाहु लागले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. सरींवर सरी कोसळत होत्या. त्यामुळे पावसाळ्याप्रमाणे रस्त्यावरून पाणी वाहत होते. या भागात अर्धातास पाऊस झाला.
जिल्ह्याच्या पूर्वपट्टयातील गावांमध्ये सतत अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे या पट्टयातील संपूर्ण आंबा हंगाम संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT