कोकण

''सुन्नतेचे सर्ग'' काव्यसंग्रहास ''साहित्य गौरव'' पुरस्कार

CD

swt1025.jpg
94927
कोल्हापूरः गोविंद काजरेकर यांचा सत्कार करताना मान्यवर.

़़़‘सुन्नतेचे सर्ग’ काव्यसंग्रहास
''साहित्य गौरव'' पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १०ः महाराष्ट्रातील नवदोत्तरी पिढीतील एक नामवंत समीक्षक आणि कवी गोविंद काजरेकर यांच्या ''सुन्नतेचे सर्ग'' या कविता संग्रहास शाहूवाडी येथील राजर्षी शाहू वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गोविंद काजरेकर हे येथील गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य असून मराठीतील एक नामवंत कवी, समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचे यापूर्वी उरल्यासुरल्या जगण्याचे रिमिक्स, कोकणातील कृषिसंस्कृती आणि लोकगीते, राजन गवस यांचे कथात्म साहित्य, समकालीन कविता सांस्कृतिक परिप्रेक्ष्य आदी महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. शाहू साहित्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास शाहुवाडी तालुक्यातील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, राजर्षी शाहू वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रकांत रेडेकर, गीतांजली काजरेकर, सरपंच शीतल घोलप, लेखक उमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. काजरेकर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष डी. बी. वारंग, खजिनदार टी. एन. शेटकर, सचिव एस. आर. सावंत, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT