कोकण

भात उत्पादकतेत लांजा, राजापुरात नाचणी सर्वाधिक

CD

संग्रहित-PNE17M34062,PNE18O11741


भात उत्पादकतेत लांजा, राजापुरात नाचणी सर्वाधिक
आर्थिक समालोचन अहवाल; उद्योगक्षेत्राचा अभाव, उत्पन्नाचा प्रमुख मार्ग शेती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः जिल्ह्याचा २०२१-२२ या वर्षाचा आर्थिक समालोचन अहवाल जाहीर झाला असून, यामध्ये लांजा तालुक्यात ३ हजार २५० किलोग्रॅम प्रति हेक्टरी तांदळाची उत्पादकता आहे. त्या तुलनेत गुहागर तालुक्यात सर्वात कमी २ हजार ४१३ किलोग्रॅम प्रति हेक्टर उत्पादकता आहे. नाचणीची सर्वाधिक उत्पादकता राजापूर तालुक्यात ३ हजार ३७ किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे. उद्योगक्षेत्राचा अभाव आणि उत्पन्नाचा प्रमुख मार्ग शेती असल्यामुळे लांजा व राजापूर तालुक्यात भात आणि नाचणीची अधिक उत्पादकता असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदले गेले आहे.
कोकणात अधिक पर्जन्यमान आहे. त्यामुळे तांदळाचे उत्पादन अधिक घेतले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील २०२१-२२ वर्षातील तांदळाचे क्षेत्रफळ ७०६ हेक्टर होते. जिल्ह्याचे तांदळाचे एकूण उत्पादन १ हजार ९९९ टन आहे. लांजा तालुक्यात शेती हाच प्रमुख उत्पन्नचा स्रोत असल्यामुळे भाताची उत्पादकता अधिक असल्याचे कारण आर्थिक समालोचन नमूद केले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत असलेल्या प्रकल्पांची संख्या व सहकारी औद्योगिक विकास मंडळाच्या क्षेत्रांतर्गत असलेल्या प्रकल्पांची संख्या शून्य आहे. याशिवाय विदेशी थेट गुंतवणूक, विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत उद्योगांची व मोठ्या उद्योगांची संख्या लांजा तालुक्यात २०२१-२२ या वर्षात झालेली नाही. लांजा तालुक्यात शेतीप्रधान व्यवसाय असून, इतर व्यवसाय त्याला पूरक आहेत. त्यामुळेच श्रममूल्य अधिक असल्याने प्रतिहेक्टरी उत्पादकता अधिक आहे. राजापूर तालुक्यात नाचणी विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत असलेला प्रकल्प आहे आणि अन्य बाबतीत कोणतेच प्रकल्प २०२१-२२ वर्षात नाहीत. याउलट राजापूर तालुक्यात नाचणीच्या प्रति हेक्टरी उत्पादकतेच्या तुलनेत तांदळाची प्रति हेक्टरी उत्पादकता २ हजार ७८९ आहे. येथे नाचणीला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले आहे. उद्योगक्षेत्राचा अभाव असल्यामुळे उत्पन्नाचा प्रमुख मार्ग शेती असल्याने अधिक उत्पादकता ही लांजा व राजापूर तालुक्यात दिसून येते.

चौकट
रासायनिक खतांचा संगमेश्वरात सर्वाधिक वापर
आर्थिक समालोचन अहवालानुसार, खरीप हंगामात रासायनिक खतांचा २०२१-२२ वर्षात सर्वाधिक संगमेश्वर तालुक्यात २ हजार ६६८ मेट्रिक टन केला गेला तर सर्वात कमी वापर खेड तालुक्यात आहे. मंडणगड तालुक्यात १७० टन आहे. लांजा तालुक्यात प्रति हेक्टरी तांदळाची उत्पादकता अधिक होती. त्यात १ हजार ७३ टन रासायनिक खतांचा वापर केला आहे. नाचणीची सर्वाधिक उत्पादकता राजापूर तालुक्यात ३ हजार ३७ किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे तर सर्वात कमी प्रति हेक्टरी उत्पादकता संगमेश्वर तालुक्यात १ हजार ९१ किलोग्रॅम आहे.


कोट
लांजा तालुक्यात भाताची जास्त उत्पादकता अधिक असण्याचे संभाव्य कारण म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कार्ब जास्त असणे आहे. या पट्ट्यातील जमीन ही अधिक उत्पादनशील आहे. शिवाय डोंगररांगा असल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कार्ब पावसाळ्यात वाहत जमिनीत येऊन मिसळते आणि त्यामुळेच ही उत्पादकता अधिक स्वरूपात दिसते.
- विजय दळवी, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र-शिरगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक ! आठवड्यात ७ हजार रुपयांनी महागले, चांदीतही ३७००० हजारांची वाढ; जाणून घ्या आजचा ताजा भाव

U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास

Year End Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला मोठं फळ देणारा योग! कल्याणासाठी ‘या’ वस्तू दान करायला विसरू नका

Ashes Series : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओंची झोप उडाली; दोन दिवसांत सामना संपल्यामुळे नुकसानीची भीती

Pune Municipal Election : मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या मुलांचे पत्ते कट; शनिवारी रात्री आले आदेश

SCROLL FOR NEXT