कोकण

उत्तम फोंडेकर यांनायुवा बागायतदार पुरस्कार

CD

swt१०२९.jpg
९४९४१
उत्तम फोंडेकर

उत्तम फोंडेकर यांना युवा बागायतदार पुरस्कार
मालवण : कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय आदर्श युवा आंबा बागायतदार पुरस्कार जाहीर झाला आहे. फोंडेकर यांनी यापूर्वी तीन वर्षे राज्यात पहिली हापूस आंब्याची पेटी पाठविली होती. जपानच्या वांग चूक या आंबा बागायतदाराचे रेकॉर्ड खंडित करण्याचा पराक्रम फोंडेकर यांच्या नावावर नोंद आहे. त्यांची आंबा उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन सावंतवाडीच्या ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा आदर्श युवा आंबा बागायतदार पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. फोंडेकर यांना यापूर्वी दिल्ली येथील आयकॉनिक अवॉर्ड कार्यक्रमात दी प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे. इतर अनेक संस्थांकडून त्यांना पुरस्कार बहाल केले आहेत. यावर्षी फोंडेकर यांना ज्ञानदीप मंडळाचा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
................
मालवणात अवैध वाळूप्रकरणी
वर्षात ७० लाख ८९ हजार दंड
मालवण, ता. १० : महसूल विभागाकडून अनधिकृत वाळू वाहतूक रोखण्यासाठी निर्माण केलेल्या स्थिर व भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येते. येथील बंदर निरीक्षकांना ७ नोव्हेंबर २०२२ व २० जानेवारीला कार्यालयाकडून परवानगी नोंदणी नसलेल्या बोटींवरही कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमितपणे कारवाई केली जात आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८१ वाहनांवर कारवाई करून ७० लाख ८९ हजार ७३० इतका दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. कालावल खाडीत वाळू गट सी १ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून शुभम शंकर रेवंडकर, पंढरीनाथ सुरेश हडकर, प्रवीण जगन्नाथ खोत, अरुण दयाळ खोत व आदित्य प्रमोद कावले अशा एकूण ५ वाळू लिलावधारकांना परवानगी दिली आहे. वाळू गट सी २ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी दिली नाही. मसुरे जुवा बेट नजीक कालावल खाडीत होणाऱ्या अधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी संबंधित मंडळ अधिकाऱ्यांकडून उभे केलेले रॅम्प तक्रार प्राप्त होताच नष्ट करण्यात येत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

Jaripatka Police Inspector Transfer : लाचलुचपत प्रकरण अंगलट; जरीपटका पोलिस निरीक्षकाची बदली

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT