कोकण

रत्नागिरी-अॅट्रॉसिटी कायद्यान्वये आरोपीला 3 वर्षे सक्तमजुरी, 10 हजार दंड

CD

अॅट्रॉसिटी कायद्यान्वये ३ वर्षे सक्तमजुरी
वृद्ध महिलेशी असभ्य वर्तन ;१२ साक्षीदार तपासले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः तळवडे (ता. राजापूर) येथे वहिवाटीच्या जागेत काटेरी कुंपण का तोडत आहात? असे विचारल्याच्या रागातून वृद्ध महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून असभ्य वर्तन केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये शिक्षा होण्याची रत्नागिरीतील ही पहिलीच घटना आहे.
अनंत मधुसूदन प्रभूदेसाई (रा. ब्राह्मणवाडी तळवडे, ता. राजापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ३० मे २०१९ ला सकाळी सातच्या सुमारास तळवडे येथे घडली होती. या प्रकरणी वृद्ध महिलेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार वृद्ध महिला घरासमोरील जमिनीत अनंत प्रभूदेसाई त्याचा लहान भाऊ आणि त्यांची आई असे तिघे आले होते. ते महिलेच्या जमिनीतील काटेरी कुंपण तोडत असल्याचे दिसून आल्यावर वृद्ध महिलेने त्यांना आमच्या जमिनीचे कुंपण का तोडत आहात, ही जागा माझ्या पतीने विकत घेतलेली आहे, असे सांगितले. याचा राग आल्याने अनंत प्रभूदेसाईने महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून तिच्याशी गैरवर्तन केले तसेच पीडितेच्या हातातील आधारासाठी असलेली काठी घेऊन तिला मारहाणही केली अशी वृद्ध महिलेची तक्रार होती.
या प्रकरणी वृद्ध महिलेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित अनंत प्रभूदेसाईविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचारास प्रतिबंध) दुरुस्ती अधिनियम २०१५चे कलम ३ (१) (आर)(एस)(डब्ल्यू) अधिनियम कलम ७ (१)(ड) सह विविध कलमे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केला. तपासात पोलिसांनी संशयितास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. मंगळवारी (ता. ११) या खटल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले. १२ साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड व दंड भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल किरण सपकाळे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT