कोकण

पर्यटकांना सौजन्यपूर्ण वागणूक द्या

CD

swt1139.jpg
95160
सिंधुदुर्गनगरीः पोलीस बैठकीत आढावा घेताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण. सोबत जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल.

पर्यटकांना सौजन्यपूर्ण वागणूक द्या
पालकमंत्री चव्हाणांचे आवाहन; पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ः सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यात विविध भागातून पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना पोलीस दलाने सौजन्यपूर्ण आणि मदतीची वागणूक द्यावी. जेणेकरुन जिल्ह्याचा नावलौकिक पर्यायाने पोलीस दलाची प्रतिमा आणि पर्यटन वाढेल, अशी अपेक्षा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री चव्हाण यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. सुरुवातीला पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये मनुष्यबळ, गुन्ह्यांची उकल, पोलीस दलाकडे असणारी साधन-सामग्री, महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजना, सागरी पोलीस ठाण्यांकडे असणारी साधन-सामग्री, रिक्त पदे, रेस्कू ऑपरेशन, नवी पर्यटन पोलीस योजना, कॅराव्हॅन, सागर किनारी गस्ती नौका आदीबाबत सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘पोलीस दलाने प्रलंबित सायबर गुन्ह्यांची उकल करावी. जिल्हा शंभर टक्के सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहनियंत्रणाखाली आणण्यासाठी लोकसहभागाची मदत घ्यावी. त्याबाबत नियोजन करावे. लोकसहभागामुळे जनजागृती होवून चांगला परिणाम होवू शकतो. पोलीस दलाला आवश्यक असणाऱ्या वाहनांसाठी निश्चितपणे निधी दिला जाईल. त्यासंदर्भात प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव पाठवावेत. सायबर गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य लोकांची फसवणूक होत असते. असे प्रलंबित गुन्हे मार्गी लावावेत. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यात विविध भागातून पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना पोलीस दलाने सौजन्यपूर्ण आणि मदतीची वागणूक द्यावी. जेणेकरुन जिल्ह्याचा नावलौकिक पर्यायाने पोलीस दलाची प्रतिमा आणि पर्यटन वाढेल.’’ या बैठकीला पोलीस दलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT