कोकण

खेड ः खेडमध्ये सापडलेला ''तो'' तांदूळ प्लास्टिकचा नाही

CD

खेडमधील ''तो'' तांदूळ प्लास्टिकचा नाही

भोस्तेतील प्रकाराची चौकशी ः तहसीलदारांकडून पाहणी
खेड, ता. १४ ः तालुक्यातील रास्त धान्य दुकान भोस्ते (तात्पुरते व्यवस्थापन निळीक) येथून वितरित करण्यात आलेल्या तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळल्याचे पुढे आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती; मात्र, या प्रकरणी खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी तातडीने या रास्त धान्य दुकानात जाऊन तिथल्या तांदळाच्या नमुन्यांची पाहणी केली. या वेळी ते तांदूळ प्लास्टिकचे नसल्याचे निदर्शनास आले तसेच याबाबत तक्रार केलेल्यांचाही संभ्रम दूर झाला असून, तहसीलदार घोरपडे यांनी पुरवठा निरीक्षक व महसूल सहाय्यक यांच्यासह भेट दिली. मार्चमध्ये उचल केलेल्या तांदळापैकी शिल्लक साठ्याची तपासणी केली. अल्प प्रमाणात पांढऱ्या रंगाचे दाणे आढळले; तो प्लास्टिकजन्य तांदूळ नसल्याचे दिसले. त्यामुळे कुठलीच तक्रार नसल्याचा जबाब दिला असल्याची माहिती तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी दिली.
निळीक गावात हनुमान जन्मोत्सव भंडाऱ्यानिमित्त गावातील निळीक (मराठवाडी) येथील हनुमान मंदिरात ६ ला महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी गावातील १० शिधापत्रिकाधारकांनी रास्त धान्य दुकान भोस्ते येथून घेतलेला तांदूळ महाप्रसादासाठी दिला होता. कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी गावातील काही महिला हा तांदूळ निवडत असताना तांदळामध्ये अल्प प्रमाणात पांढऱ्या रंगाचे तांदळाचे दाणे आढळून आले; परंतु हा तांदूळ नेहमीच्या तांदळापेक्षा थोडा फुगीर व चमकदार आढळला. त्यामुळे काही लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता, असा जबाब शिधापत्रिकाधारकांनी लिहून दिला असून आता याबाबत तक्रार नसल्याचे नमूद केले आहे, असे तहसीलदार घोरपडे यांनी स्पष्ट केले आहे.

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT