कोकण

आचऱ्यात १५४ कासव पिल्ले झेपावली समुद्रात

CD

95538
आचरा ः येथील समुद्रकिनारी संवर्धन केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले.


आचऱ्यात १५४ कासव पिल्ले झेपावली समुद्रात

कासव मित्र धुरींकडून संवर्धन; किनारी १४ घरटी, वनविभागाचाही नजर

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १३ : आचरा समुद्रकिनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी कासव मित्र सूर्यकांत धुरी यांच्या मार्गदर्शनानुसार गणेश धुरी यांनी संवर्धन केलेल्या अंड्यामधून १५४ जन्मलेल्या कासव पिल्लांना सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते समुद्री अधिवासात सोडण्यात आले.
सुर्यकांत धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत काल (ता.१२) ५१ दिवसांनी त्या अंड्यांबाहेर पडलेल्या १५४ पिल्लांची बॅच आचरा सरपंच टेमकर यांच्या हस्ते समुद्रात सोडली. आचरा-पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी आढळली होती. या वर्षाच्या सुरुवातीपासून कासव संवर्धनास वेग आला असून तब्ब्ल १४ घरटी आचरा किनाऱ्यावर तयार करण्यात आली आहेत. यातील सात बॅच टप्प्या टप्प्याने सोडण्यात आल्या आहेत. ही कासवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वीपासून समुद्रकिनारी संरक्षित करण्याचे काम कासव मित्रांनी हाती घेतले आहे. आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत असून या किनाऱ्यांना पसंती देत आहेत. यावेळी ग्रामविकास अधिकारी पी. जी. कदम, ग्रामपंचायत कर्मचारी सुशिला पांगे, गिरिधर आपकर, पोलिसपाटील विठ्ठल धुरी, कासव सवर्धक शितल धुरी, सृष्टी धुरी, पराग कुबल, महादेव जोशी आदी उपस्थित होते.
-----------
चौकट
आचरा किनाऱ्यास कासवांची पसंती
आचरा किनाऱ्यास ‘ऑलिव्ह रिडले’ या जातीची कासवे पसंती देताना दिसत आहेत. तळाशील ते आचरा हा कासवांचा अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे. या भागातील ग्रामस्थ ही अंडी सुरक्षित ठेऊन अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून त्यांचे जतन करत आहेत. दोन महिन्यानंतर पिल्ले बाहेर पडली की वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

SCROLL FOR NEXT