कोकण

केळुसकरांचा इतिहास पुढे आणावा

CD

95879
कुडाळ ः (कै.) कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या जुन्या २१ ग्रंथांच्या पुर्नप्रकाशनवेळी मान्यवर.


कृष्णराव केळुसकरांचा इतिहास पुढे आणावा

प्रा. राजन गवस; जुन्या २१ ग्रंथांचे पुर्नप्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः ज्या काळात ग्रंथ लेखन केवळ ठराविक समाजाची मक्तेदारी होती त्याकाळी बहुजन समाजातील (कै.) कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी ग्रंथ लेखन केले. बहुजन समाजाला संघटीत, जागृत करण्याचे काम त्यांनी केले. केळुसकर गुरुजींनी ४८ ग्रंथांचे लिखाण केले आहे. त्यातले केवळ २१ ग्रंथ मिळाले आहेत. त्यांचा इतिहास आजपर्यंत लपविला गेला आहे. त्यांचा इतिहास पुढील पिढीसमोर येण्यासाठी एकत्रित संघटीत होऊन प्रयत्न करा, असे आवाहन प्रा. राजन गवस यांनी येथे केले.
नाईक मराठा मंडळ (मुंबई) आयोजित गुरूवर्य स्व. कृष्णराव अर्जुन केळूसकर ग्रंथसंपदा पुनर्प्रकाश आणि वितरण सोहळा आज येथील महालक्ष्मी सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. गवस यांचा सुनील सांगेलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिनेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील सांगेलकर, उपकार्याध्यक्ष नयन सोनुर्लीकर, संयुक्त कार्यवाह किरण नाईक, न्हानू नाईक, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रा. बाळकृष्ण लळीत, सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक, उपाध्यक्ष अॅड. विवेक मांडकुलकर, डॉ. पांडुरंग वजराटकर, किरातच्या संपादिका सीमा मराठे, साहित्यिका वृंदा कांबळी, आघाडीचे संपादक नंदकिशोर महाजन, देवळी उत्कर्ष समाजाचे अध्यक्ष सावळाराम अणावकर, केळुस गावचे लक्ष्मण केळुसकर, गुरुवर्य केळुसकरांवर साहित्यावर पीएचडी करणाऱ्या सुरक्षा घोंगडे, विकास कुडाळकर, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘केळूसकर गुरुजींचा इतिहास आजही जिवंत आहे. इतिहासकारांनी त्यांचा इतिहास लोकांसमोर आणला नाही. केळूसकरांच्या इतिहासाबद्दल आज कोणताही उल्लेख केला गेला नाही. पुढचा काळ बदलायचा असेल तर घाबरू नका, केळूसकर गुरुजींचा आदर्श पुढील पिढीला द्या. केळूसकर गुरुजींनी जातीपातीचा द्वेष केला नाही. त्यांचा आदर्श जोपासा.’’ श्री. नाईक म्हणाले, ‘‘सात हजार पानांहून अधिक साहित्य लेखन त्यांनी केले आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. आपल्या जिल्ह्यातील लोकांना अजूनही माहित नाही आहे. त्यामुळे केळूसकर गुरुजींचा इतिहास पुढील पिढीसमोर येईल. त्यासाठी प्रयत्न करा.’’
यावेळी गुरुजींच्या ११ खंड ग्रंथाचे पुनर्प्रकाशन झाले. विकास कुडाळकर व वसंत केसरकर, सुरक्षा घोंगडे, प्रवीण बांदेकर, सावळाराम अणावकर, सतीश शेणवी, लक्ष्मण केळूसकर, प्रतीक्षा चिपकर, प्रभूत मडईकर यांना केळूसकर गुरुजींची पुस्तके भेट देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील काही वाचनालयांना ११ ग्रंथ संच भेट देण्यात आले. न्हानु नाईक यांनी प्रस्ताविक केले. मकरंद तोरसकर यांनी सूत्रसंचालन केले. नयन सोनुर्लीकर यांनी आभार मानले.
--
गुरुजींचे साहित्य कुणीच जपले नाही
श्री. गवस म्हणाले, ‘‘समाजाला एकत्रित करण्याचे काम केळुसकर गुरुजींनी केले. समाजातील नितीबोध गोष्टी त्यांनी एकत्र केल्या. गुरुजी सिंधुदुर्गाचे आहेत, असे सांगायचे आणि त्यांचे एकही साहित्य सिंधुदुर्गात सापडू नये, हे योग्य नाही. त्यांची पुस्तके महाराष्ट्रात कोणीही जपून ठेवली नाहीत. गुरुजींच्या नातेवाईकांनीही पुस्तके जपून ठेवली नाहीत. पहिले शिवचरित्र, बुद्ध चरित्र व संत तुकाराम चरित्र गुरुजींनी लिहिले. केळूसकर गुरुजी हे बहुजन समाजाचे होते. केळूसकर गुरुजींनी आयुष्यभर सांस्कृतिक राजकारण केले. महात्मा फुले, केळूसकर गुरुजी हे महाराष्ट्राचे आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT