कोकण

शासकीय योजनांची माहिती

CD

बातमी क्र. ११
- rat१७p१.jpg-
९६४८७
साखरपा : विविध योजनांची माहिती देताना कृषी सहाय्यक सुनील शिवपूजे

खरीप हंगामातील कृषी योजनांची माहिती

कनकाडी गावात कृषी विभाग ः कृषी सहाय्यक शिवपूजे यांचे मार्गदर्शन

साखरपा, ता. १६ : पावसाळी शेती हंगामातील विविध कृषी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कनकाडी गावात करण्यात आले होते. यावेळी प्रभारी कृषी सहाय्यक सुनील शिवपूजे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
पावसाळी शेती हंगाम आता जेमेतेम एका महिन्यावर येवून ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्‍यांना विविध कृषी योजनांची माहिती व्हावी यासाठी कनकाडी गावात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मणवाडी, शिंदेवाडी येथे हे शिबीर ग्रामपंचायत सदस्या रेवती पंडित यांच्या पुढाकारातून झाले. हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्याविषयी सविस्तर माहिती कृषी सहाय्यक सुनील शिवपूजे यांनी उपस्थितांना दिली. नाचणी, ज्वारी, बाजारी अशी तृणधान्ये आपल्या आहारात आवश्यक असल्याचे सांगून त्यांची शेती करण्याचे आवाहन शिवपूजे यांनी केले. आगामी भात लावणे हंगामाबाबत बोलताना शिवपूजे यांनी पारंपारिक भाजावळ पद्धतीचे तोटे सांगून चारसूत्री भात लागवड किंवा सगुणा तंत्रज्ञान वापरुन भात लागवड करण्याचे आवाहन केले. श्री. शिवपूजे यांनी यांत्रिकीकरण योजनेची माहिती सांगितली. या योजनेंतर्गत शेती विषयक विविध यंत्रांच्या खरेदीला मिळणाऱ्‍या अनुदानाची माहिती सांगितली. या योजनेतून वाडीतील शेतकऱ्यांनी पॉवरटिलर, भात झोडणी यंत्र, ठिबक सिंचन किट आदी खरेदीची तयारी दर्शविली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती देताना फळबाग लागवड तसेच बांधावरील साग, कोकम आदी लागवडीची माहिती दिली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा आयोजनाचीही माहिती त्यांनी दिली. शासनाच्या या विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन शिवपूजे यांनी केले. या कार्यक्रमाला सरपंच संतोष गोताड, प्रभागातील सदस्या रेवती पंडित, ग्रामस्थ अशोक भालेकर, जनार्दन हेगिष्ट्ये, कृष्णा महाडीक, सुरेश चाचे, भिवा गोवरे, विश्वनाथ शिंदे, मनीषा हेगिष्ट्ये, सुरेखा चाचे, सविता पंदेरे, लीला पंदेरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT