कोकण

''तांबळडेग दीपमंदिर'' क्रिकेट स्पर्धेत विजेता

CD

९७१०८


‘तांबळडेग दीपमंदिर’ क्रिकेट स्पर्धेत विजेता
देवगड गाबीत चषक ः महोत्सवानिमित्त समाज संस्थेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १९ ः येथील तालुका गाबीत समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत तांबळडेग येथील दीपमंदिर संघ विजेता ठरला. मान्यवरांच्या उपस्थितीत ५००० रुपये रोख आणि गाबीत चषक तसेच प्रमाणपत्र देऊन विजेत्या संघाला गौरवण्यात आले.
मालवण दांडी येथे २७ ते ३० एप्रिल दरम्यान गाबीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत येथील गाबीत समाज संस्थेच्यावतीने तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात आली. स्पर्धेमध्ये तालुक्यातील गाबीत समाजातील बहुसंख्य तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेत तालुक्यातील दहा संघ सहभागी झाले. स्पर्धेत दीपमंदिर तांबळडेग संघ विजेता, तर व्ही.आर.सी.सी. आनंदवाडी ‘ब’ संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला रोख ५००० रुपये, गाबीत चषक आणि प्रमाणपत्र, तर उपविजेत्या संघाला रोख ३००० रुपये, गाबीत चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांक यंगस्टार वीरवाडी संघास मिळाला. त्यांना रोख २००० रुपये व गाबीत चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तांबळडेग संघाचा कर्णधार कौशिक जोशी यांना मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून केदार धुरी, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तन्मय बांदेकर यांना गौरविण्यात आले. स्पर्धेतील रोख रक्कमेची बक्षिसे सूर्यकांत खवळे (तारामुंबरी) यांनी पुरस्कृत केली. महेंद्र चौघुले यांनी मंडप साहित्य उपलब्ध करून दिले. सामना समालोचक म्हणून उत्तम मुणगेकर, परेश सनये, विकी कडू, हार्दिक कुबल, ऋत्विक धुरी यांनी काम पाहिले. तर पंच म्हणून निषाद हिरनाईक, बबन ढोके, नाना निवतकर, सुजय मुणगेकर, सुमित कोयंडे, वैभव धुरी, नितीन कोयंडे यांनी काम पाहिले. सामन्यांचे गुणलेखन बंटी धुरी, सज्जन झाजम यांनी केले. यावेळी देवगड फिशरमेन्स संस्थेचे द्विजकांत कोयंडे, किशोर कुबल, दिनेश पोसम, संस्थेचे अध्यक्ष संजय पराडकर, उपाध्यक्ष लक्ष्मण तारी, सचिव संजय बांदेकर, सहसचिव सुहास पराडकर, खजिनदार अजित टाककर, कार्यकारिणी सदस्य दत्ताराम कोयंडे, धर्मराज जोशी, संदीप डोळकर, बाळू बांदेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT