कोकण

गौरव वेल्हाळांच्या गळाला जास्त वजनाचा मासा

CD

३१ (पान २ साठी)

-rat१९p२७.jpg-
९७१२३
गुहागर ः सर्वात जास्त वजनाच्या माशासोबत गौरव वेल्हाळ.
-rat१९p२८.jpg-
९७१२४
गुहागर ः सर्फ फिशिंग स्पर्धेतील विजेत्या गौरव वेल्हाळचा गौरव करताना मान्यवर.
--

गौरव वेल्हाळांच्या गळाला जास्त वजनाचा मासा

गुहागरला सर्फ फिशिंग स्पर्धा ; १०७ जणांचा सहभाग

पावस, ता. २० ः गुहागर समुद्रकिनारी प्रथमच स्पोर्ट फिशिंग असोसिएशन महाराष्ट्र सर्फ फिशिंग टुर्नामेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शृंगारतळी येथील गौरव वेल्हाळ यांना सर्वात जास्त वजनाचा मोठा मासा गळाला लागल्यामुळे गुहागरमधील पहिल्या स्पर्धेचा पहिला विजेता बनण्याचा मान मिळाला.
या स्पर्धेमध्ये एकूण १०७ स्पर्धकांनी न थकता आपले नशिब आजमावले. गुहागरमध्ये प्रथमच समुद्रकिनारी ही स्पर्धा झाल्याने स्पर्धकांसह गुहागरवासीयही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी संस्थेचे कार्यकारिणी अध्यक्ष संतोष कोळवणकर, उपाध्यक्ष आशुतोष शेलार, खजिनदार मयूर झिंगे तर सदस्यपदी संदीप दर्णे, मंदार सुर्वे यांनी मेहनत घेतली.
गुहागर किनारी तालुक्यात इतरवेळी समाजसेवेची धुरा खांद्यावर घेऊन चालणारा, प्रत्येकवेळी मदतीचा हात देणारा श्रृंगारतळीचा गौरव याने गुहागर समुद्रकिनारी प्रथमच झालेल्या स्पोर्ट फिशिंग असोसिएशन महाराष्ट्र सर्फ फिशिंग टुर्नामेंट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याने शृंगारतळी येथे या गौरवचा सर्वांकडून सन्मान करण्यात आला. मंगेश माने, अवधूत वेल्हाळ, संतोष सावंत, अविनाश वेलिंगकर, पराग कोळी, सूरज भाटकर, अरुणभा सनिग्रही यांनी मेहनत घेतली
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT