कोकण

व्यायाम शाळेचे तिरोड्यात भूमिपूजन

CD

swt2014.jpg
97303
तिरोडाः येथे व्यायाम शाळेच्या भूमिपूजन प्रसंगी प्रवीण भोसले व अन्य.

व्यायाम शाळेचे तिरोड्यात भूमिपूजन
सावंतवाडीः तिरोडा येथे जिल्हा परिषदेमार्फत क्रीडा विभागाकडून मिळालेल्या निधीतून व्यायाम शाळेचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते झाले. या व्यायाम शाळेचा पंचक्रोशीतील तरुणांना याचा फायदा होणार असून त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. गावातील या व्यायाम शाळेचा सर्वांनी लाभ घेऊन आपले आरोग्य उत्तम ठेवावे, असे आवाहन यावेळी भोसले यांनी केले. सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश सावंत, माजी सरपंच माधुरी पटेकर, अशोक केरकर, अनिल केरकर, पुरुषोत्तम शेणई, चारुदत्त शेणई, सागर नाणोसकर, पोलिस पाटील लवू रगजी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच सावंत यांनी केले. आभार ग्रामसेवक संदीप गवस यांनी मानले.
................
कट्टा येथे २८ ला वधू-वर मेळावा
मालवण : कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा यांच्यावतीने २८ एप्रिलला सकाळी साडेनऊ ते सायंकाली चार वाजेपर्यंत ओम गणेश साई मंगल हॉल, कट्टा येथे वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी एकाच छताखाली वधू-वरांना प्रत्यक्ष पाहण्याची व परिचय करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. नाव नोंदणी पश्चात विवाह जुळेपर्यंत वधू-वर निवडण्यासाठी कायमस्वरुपी नोंदणी रजिस्टर कार्यालयात उपलब्ध असणार आहे. मेळाव्यात चहा-नाश्ता, जेवणाची व्यवस्था आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ, कट्टा सर्व समिती सदस्य, पदाधिकारी आणि सर्व समाज बांधवांनी केले आहे.
................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT