कोकण

रत्नागिरी ः प्रमोद जठार भाजपचे लोकसभेचे उमेदवार

CD

प्रमोद जठार- OP१७G३२४९२

भाजपचे लोकसभेसाठी प्रमोद जठार उमेदवार?

नीलेश राणे यांच्याकडून संकेत; वाढदिवशी दिल्या शुभेच्छा
राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचा उमेदवार कोण? याचे राजकीय कोडे सुटत नव्हते; परंतु भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्या बुधवारी (ता.१९) झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी माजी खासदार नीलेश राणे यांनी ''तुम्हाला रत्नागिरी-सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना'', असे वक्तव्य जठार यांना उद्देशून केले. त्यामुळे जठार हेच भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार असल्याचे संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

राज्यातील राजकीय नाट्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबत अनेक चर्चा होत होते. भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या युतीत लोकसभेची ही जागा आम्हालाच मिळेल, असे दावे केले होते. त्यामुळे शिंदे गटाकडून अनेकवेळा किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव पुढे आले होते तर भाजपकडून माजी खासदार नीलेश राणे यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौरे वाढल्याने भविष्यातील भाजपचे उमेदवार तेच असतील असे मानले जात होते. विजयी संकल्प मेळाव्या दरम्यान त्यांच्या उजव्या बाजूला प्रमोद जठार आणि डाव्या बाजूला रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन होते. या उजव्या - डाव्यापैकी कोण असेल लोकसभेचा उमेदवार? असे विचारण्यात आले होते. तेव्हा चव्हाण म्हणाले, ‘भाजपला त्याग आणि समर्पणाची परंपरा आहे. त्यामुळे असे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. आम्हाला पक्ष जी जबाबदारी देईल ती घेऊ’, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराचे कोडे सुटत नव्हते.
भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी आमदार जठार यांचा काल कासार्डे (ता. कणकवली) येथे दणक्यात वाढदिवस साजरा झाला. जठार यांनी आगामी निवडणुकीच्यादृष्टीने केलेली ही बांधणीच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला येणाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमासह स्नेहभोजनाची व्यवस्था होती. यामध्ये त्यांनी एकप्रकारे लोकसंपर्क दाखवून दिला. शुभेच्छांसाठी येणाऱ्यांमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, म्हात्रे, माजी खासदार नीलेश राणे आदी उपस्थित राहिले होते.

चर्चेला भाषणामुळे बळ
प्रमोद जठार हेच भविष्यातील भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू आहे; मात्र जेव्हा राणे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी अनेक दिवसांपासून पडलेले कोडे हळुहळू सोडवण्यास सुरवात केली. ते म्हणाले, ‘जठार साहेब तुमचे आरोग्य उत्तम राहो, आपल्याला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT