कोकण

स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये रमजान ईद उत्साहात

CD

97741
सावंतवाडी ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये रमजान ईद साजरी करण्यात आली.

स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये
रमजान ईद उत्साहात
सावंतवाडी, ता. २२ ः येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आज रमजान ईद उत्साहात साजरी झाली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना रमजान ईदचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शिक्षिका जरिन शेख यांनी रमजान ईद या सणाविषयी माहिती सांगितली. हा सण साजरा करण्यामागे मुख्य कारण कोणते, याबाबत मार्गदर्शन केले.
या सणानिमित्त जो उपवास केला जातो, त्यामागेही आपले शारीरिक स्वास्थ कसे निरोगी राहू शकते, याचे वैज्ञानिक कारण सांगितले गेले. चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या सणानिमित्त नृत्य सादर केले. भावी पिढीमध्ये सर्वधर्मसमभाव ही शिकवण रुजवावी, यासाठी रमजान ईदवर आधारीत पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले. या नाट्याचे बोल सहाय्यक शिक्षिका नफिसा शेख यांनी सादर करून बंधुभावाने प्रत्येक जातीधर्माचे लोक एकत्र येतात, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. शेवटी सर्वांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’ देऊन कार्यक्रमाची सांगता केली. सहभागी सर्व विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे शाळेचे संचालक रुजुल पाटणकर यांनी कौतुक केले. या कार्यक्रमानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT