कोकण

नारुरला ७ मे रोजी वर्धापन कार्यक्रम

CD

नारुरला ७ मे रोजी वर्धापन कार्यक्रम
कुडाळ ः नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी पंचायतनचा सोळावा वर्धापन दिन सोहळा ७ मे रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी साडेसहाला देवता आवाहन प्रार्थना, देह शुद्धीकरण, सातला पुण्याहवाचन, श्री सुक्त विधान जपयज्ञ व षोडशोपचार सालंकृत पूजा, दहाला सत्यअंबा पूजा, दुपारी एकला महाआरती, दीडला महाप्रसाद, सायंकाळी सातला भावई भजन मंडळाचे (गोठोस) भजन, रात्री नऊला पालखी सोहळा, दहाला वालावलकर दशावतार मंडळाचे ‘लिला शरभ अवताराची’ अर्थात ‘प्रत्यंगिरा’ हे ट्रिकसीनयुक्त नाटक होणार आहे. तेथीलच श्री देव खापरा जत्रोत्सव १७ व १८ मे रोजी होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, नारुर व ग्रामस्थांनी केले आहे.
-----------------
‘नवोदय’ची २९ ला प्रवेश परीक्षा
सावंतवाडी ः जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी सहावी वर्गात प्रवेश घेण्यासाठी होणारी परीक्षा २९ एप्रिलला होणार आहे. परीक्षार्थिंनी सकाळी साडेदहाला आपल्या परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे. सोबत प्रवेशपत्र, शाळेचे ओळखपत्र, आधारकार्ड व मास्क आणणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख जे. बी. पाटील व एस. पी. हिरेमठ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य यांनी केले.
---------------------
पेडणे-गोवा येथे धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः महाराष्ट्र, गोवा राज्यातील कर्पे घराण्याचे दैवत असलेल्या पेडणे-गोवा येथील श्री देव कर्पे महापुरुष (कर्पे पिंपळ देवस्थान) देवतांचा तेरावा वर्धापन दिन (बुधवारी ता.२६) होणार आहे. त्यानिमित्त अभिषेक, धार्मिक विधी, महाप्रसाद, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव कर्पे महापुरुष देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
------------------
खानोलीत गुरुवारी दशावतार नाटक
वेंगुर्ले ः सिदू वरक मित्रमंडळ खानोलीतर्फे गुरुवारी (ता. २७) सकाळी अकराला श्री देव न्हाणीचा होळकर येथे श्रींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद व सायंकाळी सातला खानोलकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड. किशोर वरक यांनी केले आहे.
------------------
मळेवाडला गुरुवारी ‘बेईमान’ नाटक
सावंतवाडी ः मळेवाड येथील श्री देवी माऊली कला क्रीडा मंडळ व व्यापारी संघटना, मळेवाड जकात नाका यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. २७) रात्री साडेनऊला मराठी रंगभूमीवर गाजलेल्या ‘बेईमान’ या स्वतंत्र सामाजिक संघर्षमय नाटकाचे आयोजन केले आहे. या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माउली कला, क्रीडा मंडळ व व्यापारी संघटनेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT