कोकण

‘ऑलिव्ह रिडले’च्या पिलांना कालवीबंदर येथे जीवदान

CD

97747
केळुस : ‘ऑलिव्ह रिडले’च्या पिल्लांना समुद्रात सोडताना सरपंच योगेश शेटये. शेजारी हेमंत शेलटकर आदी.

‘ऑलिव्ह रिडले’च्या पिलांना
कालवीबंदर येथे जीवदान
वेंगुर्ले, ता. २२ ः केळूस कालवीबंदर येथील हेमंत शेलटकर यांनी संवर्धित केलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ५३ पिल्लांना सरपंच योगेश शेटये यांच्या उपस्थ‍ितीमध्ये गुरुवारी (ता. २०) समुद्रात सोडण्यात आले.
शेलटकर यांच्या माध्यमातून कालवीबंदर किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन होत आहे. यावर्षी प्रथमच ३१ जानेवारीपासून त्यांनी कासवाच्या अंड्यांचे संवर्धन सुरू केले. आतापर्यंत कालवीबंदर येथे एकूण २४ घरट्यांतून २७३८ अंडी संवर्ध‍ित करण्यात आली आहेत. या संवर्ध‍ित अंड्यांतून आतापर्यंत १४५९ कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शेलटकर यांनी घेतलेल्या या मेहनतीबद्दल सरपंच शेटये यांनी कौतुक केले. यावेळी केळूस मच्छीमार सोसायटी चेअरमन गोविंद उर्फ दादू केळूसकर, ग्रामपंचायत सदस्य महेश नागवेकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उर्फ आबा वराडकर, ग्रामपंचायत सदस्या मानसी कुडव, ग्रामपंचायत सदस्य रुचिरा प्रभूकेळूसकर, केळूस खारभूमी सोसायटीचे व्हाईस चेअरमन रवींद्र प्रभूकेळूसकर, पुणे येथील पर्यावरणप्रेमी पर्यटक अतुल घाग, ग्रामस्थ दीपक राऊळ, अशोक कुबल आदी उपस्थ‍ित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT