कोकण

इन्फिगोतर्फे मंडणगड, खेडमध्ये करणार तपासणी

CD

१० (पान ६ साठी)

इन्फिगो आय केअरचे रेटिनातज्ज्ञ
मंडणगड, खेडमध्ये करणार तपासणी

रत्नागिरी, ता. २२ : इन्फिगो आय केअर हॉस्पीटल खेड येथे सुरू झाल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. हॉस्पीटलतर्फे सोमवारी (ता. २४) मंडणगड नगरपंचायत सभागृहात प्रख्यात रेटीनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत डायबेटीस असलेल्यांच्या डोळ्यांच्या पडद्याची तपासणी करणार आहेत. तसेच डॉ. कामत २५ व २६ एप्रिल रोजी खेड येथील इन्फिगो आय केअरमध्ये तपासणी करणार आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.
२४ एप्रिलला मंडणगड नगर पंचायतीमध्ये सकाळी १०.३० ते ५ या वेळेत ते डायबेटिसमुळे झालेल्या रेटिनारुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरामध्ये ओसीटी स्कॅन, उपचारांमध्ये सवलत देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी नावनोंदणी करून उपचार करून घेता येतील. इन्फिगो आय केअरचे रेटिनातज्ज्ञ डॉ. कामत हे दर महिन्यातून एकदा खेडमध्ये रेटिनारुग्णांची (डोळ्याचा पडदा) तपासणी करून उपचार करत आहेत.
खेड एसटी डेपोजवळ, गोळीबार मैदान, डॉ. धारिया हॉस्पीटल बिल्डींमध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पीटल सुरू झाल्यापासून अनेक रुग्णांनी लाभ घेतला आहे. डोळ्याच्या पडद्याची तपासणी व अत्याधुनिक उपचार येथेच केले जातात. येथे ग्रीन लेझर, डायमेन्शनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड ॲनालायझर, अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणा आहे. याद्वारे रेटीनाच्या समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तपासणी केली जाते. अत्याधुनिक अशा सूक्ष्म पद्धतीने केली जाणारी बिनटाक्याची व भूल न देता होणारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पडद्याच्या (रेटिना) सर्व शस्त्रक्रिया होणारे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील हे एकमेव रुग्णालय असणार आहे.
शिबिरात सहभागासाठी व पूर्वनोंदणीसाठी खेड येथे रुग्णालयाशी संपर्क साधावा. उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील जनतेने या सुविधाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ठाकूर यांनी केले आहे.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT