३ (पान २ साठी, संक्षिप्त)
-rat२२p१.jpg ः
९७७१७
रत्नागिरी ः शहरातील कोकणनगर-राजनगर येथे मुस्लिम बांधवांना ईदीच्या शुभेच्छा देताना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सोबत अन्य पोलिस पदाधिकारी.
--
जिल्हा अधीक्षकांतर्फे ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
रत्नागिरी ः शहरातील कोकणनगरशेजारी असलेल्या राजनगर येथील मरकजबाहेर जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांच्यासमवेत जयश्री गायकवाड, वाघमारे, शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान पाटील आदी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अनेक मुस्लिम बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
------
संस्कृत पाठशाळेत पेंडसे यांचे व्याख्यान
रत्नागिरी ः शहरातील झाडगाव येथील गोविंदकृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत प्रतिवर्षी वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्य जयंती साजरी करण्यात येते. यानिमित्त येत्या २५ एप्रिलला सायंकाळी ५ वा. संस्कृत पाठशाळेत सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार, श्रीनिवास पेंडसे यांचे शांकरदिग्विजय या विषय़ावर व्याख्यानाचे आयोजित केले आहे. सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष वैद्य मंदार भिडे, सचिव जयराम आठल्ये, पाठशाळेचे पदाधिकारी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.