कोकण

नमाज पठणासह गळाभेटीने ईदच्या शुभेच्छा

CD

97817
नांदगाव ः ‘रोजा’ धरलेल्या लहान मुलांना गौरविताना मुस्लिम बांधव.


नमाज पठणासह गळाभेटीने ईदच्या शुभेच्छा

नांदगावात मुस्लिम बांधवांमध्ये; ‘रोजा’ धरलेल्या चिमुकल्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २२ ः पवित्र रमजान महिना पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठा सण ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सण येथे आज उत्साहात साजरा झाला. येथील मदिना व गौसिया या दोन्ही मशिदींमध्ये नमाज पठण करीत घरोघरी शीरखुरमा व गळाभेट घेत मुस्लिम बांधवांनी ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. येथील सात छोट्या बालकांनी पवित्र रमजान महिन्यात पूर्ण एक महिना रोजे (उपवास) धरून ते पूर्णही केल्याने त्यांचा गौरव करण्यात आला. परिसरातील हिंदू बांधवांनी दरवर्षीप्रमाणे मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रमजान ईदनिमित्त नांदगाव परिसरात मोठा उत्साह दिसून आला. यावेळी मुस्लिम बांधवांकडून नवीन वस्त्र परिधान करून येथील मदिना व गौसिया या मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांकडूनही शुभेच्छा देण्यात आल्या. सगळीकडे रमजान ईदचा माहोल होता. मुस्लिम धर्मियांमध्ये रमजान ईदचे विशेष महत्त्व आहे. महिनाभर उपवास (रोजा) केल्यानंतर ईदच्या दिवशी आनंदोत्सव साजरा खरीत शीरखुरमाचा आस्वाद घेण्यासाठी आप्तेष्ट, मित्रपरिवारांना आवर्जून निमंत्रित करण्यात आले.
येथील खलिद बटवाले, हुस्न बटवाले, शोएब बटवाले, जोहा बटवाले, निकत बटवाले, राहत बटवाले, हासन बटवाले या ६ ते ९ वर्षांखालील मुलांनी रोजे पाच वेळा नमाज पठण केले. त्यामुळे त्यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, अहमद बटवाले, रज्जाक बटवाले, खतुनबी बटवाले, सईद बटवाले, आरिफ बटवाले, आसिफ बटवाले, यासीन बटवाले आदी उपस्थित होते. या बालकांना त्यांचे आई-वडील व इतर सर्व मंडळींनी मार्गदर्शन केले. ईद निमित्त दोन्ही मशिदींमध्ये आकर्षक रोषणाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

Shevta Mahadev Temple : जायकवाडी धरणाच्या लाटांखाली 54 वर्षे हरवलेला वारसा पुन्हा जिवंत होणार; शेवता ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय, 'हेमाडपंथी' वैभव परतणार!

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून नागरिक हैराण

Satara News : ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये महायुतीची कसोटी; सातारा- सांगली विधान परिषदेसाठी नव्या समीकरणांची नांदी; झेडपी निवडणुकीनंतर बदलली गणिते?

IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

SCROLL FOR NEXT