कोकण

वाशिष्ठीच्या गाळ उपशासासाठी 20 लाख

CD

२३ ( पान ३ साठीमेन)


-ratchl२२२.jpg ः
९७७९४
चिपळूण ः नद्यांतील गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्री उदय सामंत.
--
वाशिष्ठीच्या गाळ उपशासासाठी २० लाख

मंत्री सामंतांचा पुढाकार ; काम थांबण्याची होती शक्यता

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः वाशिष्ठीतील गाळ काढण्यासाठी निधीची चणचण निर्माण झाली असून, पावसाच्या तोंडावर निदान पहिल्या टप्प्यातील गाळ निघावा यासाठी चिपळूण बचाव समिती व नाम फाउंडेशनच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी २० लाखाचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातील उर्वरित गाळ काढण्याच्या कामास चालना मिळणार आहे.
जिल्ह्यातील गाळ काढण्याच्या कामाचा आढावा पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे घेतला. या वेळी जिल्हाधिकारी, जलसपंदा विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, यांत्रिकीचे कार्यकारी अभियंता काझी, चिपळूण प्रांताधिकारी प्रवीण पवार आदी उपस्थित होते. या वेळी चिपळुणातील वाशिष्ठीच्या गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला. गतवर्षी पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्यासाठी १० कोटी मंजूर झाले होते. त्यातून वाशिष्ठीसह शिवनदीतील गाळ काढण्यात आला; मात्र पहिल्या टप्प्यातील उर्वरित गाळ काढण्यासाठी निधीचा प्रश्न निर्माण झाला होता. पावसाळ्यापूर्वी हे काम थांबण्याची शक्यता होती. या विषयी ओरड झाल्यानंतर शासनाने ४ कोटी ८६ लाख रुपयाचा निधी वाशिष्ठीतील गाळ काढण्यासाठी मंजूर केला. त्यास अध्यादेश काढून प्रशासकीय मान्यताही दिली; मात्र हा मंजूर निधी जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडे वर्ग होईपर्यंत गाळ काढण्याचे काम थांबू नये यासाठी २० लाखाचा निधी यांत्रिकी विभागास देण्याच्या सूचना पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शासनातर्फे खेड तसेच डिंगणी व कुरधुंडा येथील नद्यांतील गाळ काढण्यासाठी ३५.७२ लाख निधी मंजूर झाला होता; मात्र विविध कारणांनी हा निधी खर्च झालेला नाही. यामध्ये खेड जगबुडी व नारंगी गाळ काढण्यासाठी १४.४२ लाख, जगबुडी व नारंगी नदीतील गाळ काढणे दुसरा टप्पा करिता १४.४२ लाख होता; मात्र सीआर झेडची मान्यता प्रलंबित असल्याने हे काम मार्गी लागलेले नाही. संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी नदीतील गाळ काढण्यासाठी २.४० लाख निधी मंजूर होता. येथे लागून गॅस पाईपलाईन असल्याने काम झालेले नाही तसेच कुरधुंडा येथे स्थानिक नदीतील गाळ काढण्यासाठी ४.४८ लाख मंजूर होते; परंतू नदीतील पाणीपातळी जास्त असल्याने हे काम झालेले नाही. असा ३५.७२ लाखाचा निधी खर्ची पडलेला नाही. त्यामुळे हा निधी वाशिष्ठी नदीतील टप्पा-१ मधील गाळ काढण्यासाठी इंधनासाठी द्यावा, अशी मागणी यांत्रिकी विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT