कोकण

रत्नागिरी- क्राईम

CD

नागपूर स्पेशल रेल्वेत प्रवाशाला लुटले
रत्नागिरी ः कोकण रेल्वेच्या मडगाव-नागपूर स्पेशल गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याची रोख रक्कम व गळ्यातील चेन चोरली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ७) घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री ही गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे थांबली असता दोन अनोळखी प्रवाशांनी शितपेय या प्रवाशाला पिण्यास दिले. त्यामुळे त्यांना गुंगी आली. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पाकिटातील रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची चेन पळवली. याप्रकरणी प्रवाशाने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
-------

कोतवडेत हातभट्टी दारूविक्रीवर कारवाई
रत्नागिरी ः तालुक्यातील कोतवडे-घारपुरेवाडी येथील वृद्धाने विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगली. ग्रामीण पोलिस ठाण्यात वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश बाबू ठोंबरे (वय ६२, रा. कोतवडे-सनगरेवाडी, रत्नागिरी) असे वृद्धाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित वृद्धाने गुरूवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोतवडे-घारपुरेवाडी येथे वहाळाच्या बाजूस एका आयनाच्या झाडाखाली गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत पोलिसांच्या निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
---------
रिक्टोलीत वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू
चिपळूण ः तालुक्यातील रिक्टोली इंदापूर येथील एका वयोवृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. २१) हा प्रकार उघडकीस आला. निर्मला शिंदे असे मृत्यू झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. शिंदे यांचा मुलगा व मुलगी व्यवसायानिमित्ताने मुंबईत असतात. २१ एप्रिलला सकाळी पाणी भरण्यासाठी निर्मला शिंदे न आल्याने त्यांना पाहण्यासाठी त्यांचा पुतण्या घरी गेला होता. त्यावेळी त्या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्या होत्या. या घटनेची खबर त्याने निर्मला शिंदे यांच्या मुलांना दिली व बोलावून घेतले. या घटनेची माहिती अलोरे शिरगांव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिंदे यांच्या घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. शवविच्छेदनानुसार हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणीतरी चोरीच्या उद्देशाने घरी जाऊन घातपात केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT